शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: सोशल मीडियावर जाहिरात करताय ? सायबर सेलची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 10:52 IST

सोशल मीडियाला कोणतेही बंधन नसल्याने विविध माध्यमातून दररोज लाखो पोस्ट व्हायरल होतात.

अहमदनगर : सोशल मीडियाला कोणतेही बंधन नसल्याने विविध माध्यमातून दररोज लाखो पोस्ट व्हायरल होतात. परंतु लोकसभा निवडणूक काळात यावर ब्रेक लागणार आहे. एखाद्या उमेदवाराच्या जाहिरातीची पोस्ट टाकण्याआधी त्याची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रणाबाबत माहिती दिली. उमेदवार अथवा त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या राजकीय पक्षांच्या जाहिरातींना प्रसारणपूर्व परवानगी आवश्यक राहणार आहे. उमेदवारांनी ते करणार असलेल्या जाहिरातीचा मजकूर आणि आॅडिओ/व्हिडीओ यांची सीडी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून प्रसारणासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र घेऊनच प्रसारित करावी लागणार आहे. यासाठीचा खर्च संबंधित उमेदवारांच्या खात्यात नोंदविणे आवश्यक आहे. विनापरवानगी कोणताही जाहिरात मजकूर इलेक्ट्रॉनिक माध्यम, सोशल मीडियातून प्रसारित करण्यास प्रतिबंध असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर्षी भारत निवडणूक आयोगाने माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीमध्ये सोशल मीडियातील मजकूरावर देखरेखीसाठी या क्षेत्रातील माहितगारास समितीत घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सायबर सेलचे पोलीस निरीक्षक निवडणूक काळात सोशल मीडियावर लक्ष ठेवून असणार आहेत. यावेळी सदस्य सचिव तथा प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी माध्यम प्रमाणिकरण व माध्यम सनियंत्रण समितीचे कार्य, प्रमाणन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आदी माहिती दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर