शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
4
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
5
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री
7
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
8
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
9
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
10
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
11
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
12
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
13
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
14
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
15
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
16
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
17
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
18
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
19
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
20
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य

लॉकडाऊनमुळे शेतक-याच्या आशेवर फिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 18:17 IST

अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटात दळणवळण व्यवस्था कोलमडली आणि या युवा शेतक-याच्या आशेवर पाणी फिरले.

राजूर : मेहनत, मशागत आणि जिद्दीला योग्य व्यवस्थापनाची जोड देत युवा शेतक-याने काकडीची बाग फुलवली. त्याने केलेल्या कष्टाला फळही मिळाले.दिवसाआड तीन टनापर्यंत उत्पादनही सुरू झाले. अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटात दळणवळण व्यवस्था कोलमडली आणि या युवा शेतक-याच्या आशेवर पाणी फिरले.पारंपरिक शेतीला फाटा देत विठ्ठल चौधरी या तरुण शेतकऱ्याने कर्जाऊ रक्कम घेत कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक एकर क्षेत्रात शेडनेट हाऊसची उभारणी केली. त्यात ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. पावसाळी हंगामात झेंडू घेत त्यांनी दमदार सुरुवात केली. तर उन्हाळी पिकाचे नियोजन करत शिमला मिरची आणि काकडीचे उत्पादन घेण्यास त्यांनी सुरुवात केली. यावर्षी काकडीचा बाग उभी करण्याचे ठरवले. नियोजनाप्रमाणे ४८ हजार रुपयांचे काकडीचे बी त्यांनी खरेदी केले. शेणखताचा वापर करत शेतीची मशागत केली. बेड तयार करत नवीन मल्चिंग पेपरचा वापर करत बियांचे रोपण केले. चोख व्यवस्थापनामुळे ३५ दिवसांत काकडीच्या बहरलेल्या वेलींना मोठ्या प्रमाणात काकड्या लगडल्या. या वर्षी कर्ज फिटणार असा आशावाद निर्माण झाला. पहिला तोडा सुरू होणार तोच लॉकडाऊन सुरु झाले. वाहतूक व्यवस्था नसल्याने आणि बाजारपेठा बंद असल्याने मोठी समस्या त्यांना निर्माण झाली. बाजारपेठ सुरू झाली असली तरी फक्त साडेतीन टन माल व्यापारी घेत आहेत. उरलेला माल जनावरांना चारा म्हणून विठ्ठल चौधरी वापरु लागले.

चौदा लाख रुपये खर्च करून तीन वर्षापुर्वी एक एकर क्षेत्रात शेडनेट उभे केले. दहा लाख रुपये कर्जाऊ घेतले. आत्मविश्वासाने पारंपरिक शेतीला बाजूला करत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत शेती सुरू केली. पहिल्या वर्षी तीन लाख रुपयांचे खर्चासह उत्पन्न मिळाले. दुसरे वर्षी बाजार भाव कोसळले. यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. उन्हाळ्यात काकडीचे नियोजन केले. नियोजनाप्रमाणे उत्पन्नही मिळू लागले. कोरोनामुळे दळणवळण व्यवस्था कोलमडली. काकड्या जनावरांसाठी  वापरत आहे. – विठ्ठल चौधरी, शेतकरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले