शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गाढवांचा बंदोबस्त न केल्यामुळे कोल्हार येथील तलाठी कार्यालयाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 16:55 IST

मोर्चा काढूनही गाढवांचा बंदोबस्त न केल्याने कोल्हार खुर्द येथील शेतकरी संतप्त झाले़ संतप्त शेतक-यांनी तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकले. येत्या पाच दिवसात शेतमालाचे नुकसान करणा-या गाढवांचा बंदोबस्त न केल्यास रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

राहुरी : मोर्चा काढूनही गाढवांचा बंदोबस्त न केल्याने कोल्हार खुर्द येथील शेतकरी संतप्त झाले. संतप्त शेतक-यांनी तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकले. येत्या पाच दिवसात शेतमालाचे नुकसान करणा-या गाढवांचा बंदोबस्त न केल्यास नगर-मनमाड राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.गेल्या आठवड्यात गावक-यांनी गाढवांच्या बंदोबस्तासाठी मोर्चा काढला होता. राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे व मंडल अधिका-यांना लेखी निवेदनही दिले होते. शेतक-यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून बंदोबस्त करू, अशी ग्वाही महसूल विभागाने दिली होती. मात्र, गाढवांचा बंदोबस्त न केल्यामुळे ही गाढवे शेतक-यांच्या शेतामध्ये चरत आहेत. त्यामुळे शेतक-यांनी कामगार तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकले.वाळूचा व्यवसाय करणारे वाळू वाहून झाल्यानंतर गाढवांना मोकाट सोडून देत आहेत. कोल्हार परिसरात असलेले ऊस, चारा व भाजीपाला पिकात शिरून गाढवांचा कळप शेतीची नासधूस करीत आहे. गाढवांच्या माध्यमातून वाळूचा उपसा होत असताना महसूल प्रशासन कारवाई का करीत नाही, असा सवाल शेतक-यांनी केला. काही गाढवे शेतकरी शरद शिरसाट यांनी शेतात पकडून ठेवली. शेतात गाढवांनी केलेले नुकसान पाहण्यासाठी कामगार तलाठी हरिश्चंद्रे मुठे यांनी यावे, अशी मागणी केली. मात्र, त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेतक-यांनी तलाठी कार्यालयास कुलूप ठोकले. यावेळी सरपंच प्रकाश पाटील, सुरेश जाधव, श्रीधर शिरसाट, शरद शिरसाट, राजेंद्र भालेराव, गणेश राऊत, प्रभाकर शिरसाट, गणेश डोके, सचिन शिरसाट, नाना चिखले आदी शेतकरी उपस्थित होते.

कोल्हार खुर्द परिसरात गाढवांचा उपद्रव वाढला आहे. ५० गाढवं वारंवार शेतात शिरून पिकांची नासधूस करतात. महसूल विभागाकडे यासंदर्भात वारंवार तक्रार करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात गाढवांचा बंदोबस्त करू, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे. दखल न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल.-प्रकाश पाटील, सरपंच, कोल्हार खुर्द 

गाढवांच्या मालकांना नोटीस काढण्यात आली आहे़ आम्ही व्यवसाय करणार नाही, असे लिहून घेण्यात आले आहे. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात गाढवांचा बंदोबस्त करण्यात येईल. यापुढे शेतक-यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी महसूल विभाग घेईल.-अनिल दौंडे, तहसीलदार, राहुरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी