शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक माणूसच प्रश्न सोडवेल-भानुदास मुरकुटे; कांबळे यांच्या प्रचारार्थ सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 16:54 IST

समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे हक्काच्या पाण्यावर गदा आली आहे. भविष्यात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा लागेल. त्यामुळे शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून द्या, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.

श्रीरामपूर : समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे हक्काच्या पाण्यावर गदा आली आहे. भविष्यात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा लागेल. त्यामुळे शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून द्या, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.मतदारसंघातील चांदेगाव, ब्राम्हणगाव भांड, करजगाव, बोधेगाव, जातप, त्रिंबकपूर, लाख, मुसळवाडी, बेलापूर खुर्द, पढेगाव, निपाणीवडगाव येथील  प्रचारसभांमध्ये मुरकुटे बोलत होते. हिम्मत धुमाळ, काशिनाथ गोराणे, अभिषेक खंडागळे, भाऊसाहेब हळनोर, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, भाजपचे बबन मुठे, शिवसेनेचे अशोक थोरे, अरुण पाटील उपस्थित होते.मुरकुटे म्हणाले, सन १९९९ ते २००९ या दहा वर्षात तालुका भकास झाला. हक्काचे पाणी गेले. शेती उजाड तर शेतकरी उदध्वस्त झाला. पाण्याअभावी केवळ  शेतीच नाही, तर दूध व्यवसायालाही फटका बसला. बारमाही शेती जिरायती बनली आणि त्यावर अवलंबून असणाºया शेतमजूर व गोरगरिबांचा रोजगार गेला. आज अशोक उद्योग समूह एवढे एकच विकासाचे व अर्थकारणाचे केंद्र उरले आहे. पाटपाण्याअभावी अशोक व राहुरी असे दोन्ही साखर कारखाने अडचणीत सापडले.  या कामधेनू वाचवायच्या असतील तर महायुतीच्या उमेदवारास विजयी करा.भाऊसाहेब कांबळे म्हणाले, निवडणुकीच्यावेळी अवतरणा-यांनी तालुक्याची उठाठेव करु नये. आम्ही येथेच जन्मलो आणि वाढलो असून येथील प्रश्न आम्हाला माहिती आहेत. हिम्मत धुमाळ म्हणाले, निवडणुकांमध्ये तोंड दाखविणा-या नेत्यांना जनता घरी बसवणार आहे. भाऊसाहेब कांबळे हे हॅट्रिक साधणार आहेत. रावसाहेब थोरात, सोपान राऊत, भाऊसाहेब उंडे, नितीन बनकर, आबासाहेब थोरात, रामुआण्णा थोरात, सुनील थोरात, अनिल थोरात, अशोक थोरात उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019