शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

ऐकावे ते नवलच! राहुरीत शेतक-यांनी काढला गाढवांविरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 17:13 IST

वीज मिळत नाही म्हणून महावितरणविरोधात मोर्चा, पाणी मिळत नाही म्हणून ग्रामपंचायत व पालिका आणि पाटबंधारे विभगााच्या विरोधात मोर्चा, उसाला चांगला भाव मिळावा म्हणून कारखान्यांविरोधात मोर्चा, प्रश्न सुटत नाहीत म्हणून प्रशासनाविरोधात मोर्चा असे मोर्चे तुम्ही पाहिले असतील. बातम्याही वाचल्या असतील. पण चक्क गाढवाविरोधात मोर्चा काढल्याची घटना मंगळवारी राहुरीत घडली.

ठळक मुद्देप्रवरा नदी पात्रातून वाळू वाहण्यासाठी गाढवांचा वापर होतो. मोकाट सुटलेली गाढवे शेतक-यांचा ऊस, घास व भाजीपाल्याचे नुकसान करतात. शासनाने या गाढवांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शेतक-यांना मोर्चा काढण्याची वेळ आली.

राहुरी : वीज मिळत नाही म्हणून महावितरणविरोधात मोर्चा, पाणी मिळत नाही म्हणून ग्रामपंचायत व पालिका आणि पाटबंधारे विभगााच्या विरोधात मोर्चा, उसाला चांगला भाव मिळावा म्हणून कारखान्यांविरोधात मोर्चा, प्रश्न सुटत नाहीत म्हणून प्रशासनाविरोधात मोर्चा असे मोर्चे तुम्ही पाहिले असतील. बातम्याही वाचल्या असतील. पण चक्क गाढवाविरोधात मोर्चा काढल्याची घटना मंगळवारी राहुरीत घडली. त्याला कारणही तसेच आहे. ही गाढवे शेतक-यांच्या पिकांचे नुकसान करीत असल्याची तक्रार शेतक-यांनी केली आहे.प्रवरा नदी पात्रातून वाळू वाहण्यासाठी गाढवांचा वापर होतो. वाळू वाहून झाल्यानंतर या गाढवांना मोकळे सोडून दिले जाते. मोकाट सुटलेली गाढवे शेतक-यांचा ऊस, घास व भाजीपाल्याचे नुकसान करतात. शासनाने या गाढवांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शेतक-यांना मोर्चा काढण्याची वेळ आली. कोल्हार खुर्दचे कामगार तलाठी हरिश्चंद्र मुठे व मंडल आधिकारी बी. एल. वडीतके यांच्यावर शेतक-यांनी प्रश्नांचा पाऊस पाडत गाढव मालकांवर का कारवाई केली नाही, असा सवाल उपस्थित केला.यापूर्वी शेतक-यांनी गाढवांच्या मालकांकडेही तक्रारी केल्या होत्या. मात्र, मालकांनी त्या तक्रारींची दखल घेतली नाही. गाढवांवरुन अवैद्यरित्या वाळू उपसा करायचा आणि वाळू उपसा झाला की गाढवांना मोकाट सोडून द्यायचे, या वाळू वाहतूकदारांच्या आठमुठे धोरणाला शेतकरी कंटाळले आहेत. त्यामुळे शेतक-यांनी हा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीधर शिरसाट, गणेश राऊत, रवींद्र शिरसाट, संजय भोसले, प्रकाश चिखले आदी सहभागी झाले होते. सरपंच प्रकाश पाटील यांनीही गाढवांमुळे शेतक-यांचे होणारे नुकसान टाळण्याची गरज व्यक्त केली.

गाढवामुळे शेतीचे नुकसान होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. गाढवांच्या मालकांची यादी तयार केली जाईल. तयार केलेली यादी राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्याकडे पाठविण्यात येईल. संबंधीतावर त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नदी पात्रात असलेल्या रस्त्यावर खड्डे खोदून वाहतुकीला प्रतिबंध केला जाईल.-हरिश्चंद मुठे, कामगार तलाठी-बी. एल. वडीतके, मंडल अधिकारी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी