शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२४० अनुकंपाधारकांची ज्येष्ठता यादी लवकरच : साडेतीनशे अर्ज प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 12:23 IST

जिल्हा परिषदेने अनुकंपाधारकांना नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, सेवाज्येष्ठता यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेने अनुकंपाधारकांना नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, सेवाज्येष्ठता यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपाधारकांना दिलासा मिळणार आहे.जिल्हा परिषदेने यापूर्वी केलेल्या अनुकंपा भरतीची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाकडे अनुकंपाधारकांचे २५० अर्ज नोकरीसाठी प्राप्त झाले होते.  त्यापैकी ६५ जणांना नोकरी मिळाली असून, अपात्र अर्जांची संख्या ४५ इतकी आहे. उर्वरित २४० अनुकंपाधारकांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादी प्रसिद्ध करताना ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. अर्ज परिपूर्ण आहे, अशा व्यक्तींचा ज्येष्ठता यादीतील वरच्या क्रमांकावर समावेश असणार आहे. कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्यांचा समावेश सर्वांत शेवटी असणार आहे. ज्येष्ठता यादीतील वरच्या क्रमांकावर असणाºयांना जिल्हा परिषदेतील रिक्त जागांवर नियुक्ती जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हा परिषदेत अनुकंपाभरतीचा तिढा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे़ अनुकंपाधारक अर्ज दाखल करतात़ परंतु, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत नाहीत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, प्रशासनाकडूनही तसे प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे पायपीट करूनही नोकरी मिळत नाही़ अनेकांची तर वयाची मर्यादा संपुष्टात येते. पण, नोकरी मिळत नसल्याचे प्रकार जिल्हा परिषदेत यापूर्वी घडलेले आहेत. त्यामुळे आगामी अनुकंपा भरती पारदर्शकपणे करण्याचा सामान्य प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.हरकतींसाठी पंधरा दिवसच्कागदपत्रांची पूर्तता करणा-यांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीवर हरकती नोंदविण्यासाठी १५ दिवसांची मदत असणार आहे. मुदतीत प्राप्त झालेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद