शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पैशासाठी मित्राचा खून करणा-या तिघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 18:44 IST

श्रीरामपूर : एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मित्राचे अपहरण करत त्याचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या तिघा युवकांना येथील जिल्हा व ...

ठळक मुद्देएक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मित्राचे अपहरण करत त्याचा दगडाने ठेचून खून

श्रीरामपूर : एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मित्राचे अपहरण करत त्याचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या तिघा युवकांना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.डी.पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पैैशासाठी महाविद्यालयीन युवकांनी केलेल्या या कृत्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.शिक्षा सुनावलेल्या आरोपींमध्ये अजय दिनकर मोरे, पराग मच्छिंद्र पटारे व धिरज शंकर शिंदे यांचा समावेश आहे. त्यांना विविध गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. यासह तिघांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. दंडातील दहा हजार रुपये मयताची आई मिनाक्षी चांदगुडे यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मयत गणेश चांदगुडे (रा.मूळ चासनळी, ता.कोपरगाव) हा मातापूर येथील त्याचे मामा सुनील सीताराम दौंड यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होता. तो श्रीरामपुरातील बोरावके महाविद्यालयात शिक्षण घेत होता. १२ मार्च २०१५ रोजी त्याने मित्र पराग पटारे याच्या घरी अभ्यासासाठी जातो असे सांगून बाहेर पडलेला गणेश पुन्हा परतलाच नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात आला. पोलिसांना खबर देण्यात आली.आरोपींनी गणेश याला नेवासे फाटा येथे दारू पाजून औरंगाबाद रस्त्याने गंगापूर हद्दीत नेत तेथे त्याचा दगडाने ठेचून खून केला. हत्येनंतर मृतदेह रॉकेलने पेटवून देण्यात आला. ही घटना जिल्हाभर गाजली. सरकारच्या वतीने या खटल्यात २६ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्या सर्वच निकालाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयात सरकार पक्षाकडून अ‍ॅड.भानुदास तांबे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड.प्रसन्न गटणे यांनी सहाय्य केले.हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. त्यात कुठलाही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. मयताच्या आईला आलेल्या मोबाईलवरील मेसेज व मयताच्या मोबाईल फोनच्या आयएमईआय क्रमांकावरून गुन्ह्याचा तपास लागला. सरकारी वकिलांनी पुराव्याची साखळी साक्षीदारांना तपासून जुळविली. न्यायवैैद्यक प्रयोगशाळेची मोठी मदत झाली. मोबाईलवरील मेसेज सीडीमध्ये रुपांतरित करून ती न्यायालयात लॅपटॉपवर पाहण्यात आली. त्यावरून खटल्याचा निकाल देण्यात आला. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर