शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र; कॅन्सरतज्ज्ञ डॉ़. सतीश सोनवणे यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 14:21 IST

सद्यस्थितीला भारतात कॅन्सरने दररोज २२०० जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे व्यसनमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र आहे, असे मत मॅक्सकेअर हॉस्पिटलचे संचालक व कॅन्सरतज्ज्ञ डॉ़. सतीश सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

मौख्यिक आरोग्य दिन विशेष/अरुण वाघमोडे/ अहमदनगर : भारतात दरवर्षी नव्याने १५ ते १७ लाख लोकांना कॅन्सर (कर्करोग) होतो. यातील ४० टक्के लोकांना केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सरची लागण होते. सद्यस्थितीला भारतात कॅन्सरने दररोज २२०० जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे व्यसनमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र आहे, असे मत मॅक्सकेअर हॉस्पिटलचे संचालक व कॅन्सरतज्ज्ञ डॉ़ सतीश सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले़.जागतिक कर्करोग दिन व मौखिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. सोनवणे यांच्याशी बुधवारी संवाद साधला. ते म्हणाले, कॅन्सरची अनेक कारणे आहेत. परंतु मुख्यत: तंबाखूचे सेवन, सिगारेट, विडी, गुटखा व दारु यामुळे कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त आहे. या व्यतिरिक्त विविध रसायनांचे शरीरावर होणारे परिणाम, जंतूसंसर्ग, शरीराच्या एखाद्या भागाला वारंवार होणारी जखम, शरीरातील हार्मोन्सचे अनियंत्रण, रेडिएशन आदी कारणांमुळेही कॅन्सर होतो. भारतात २५ कोटी तर महाराष्ट्रात अडीच कोटी लोक तंबाखूचे सेवन करतात. यातील २५ टक्के लोकांना कॅन्सरची बाधा झालेली आहे. यावरून तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम आपल्या निदर्शनास येतात. सध्या महाराष्ट्रासह भारतात शासकीय यंत्रणा व विविध सामाजिक संस्थांकडून तंबाखूजन्य पदार्थांबाबत प्रबोधन मोहीम राबविली जात आहे. मात्र यात आणखी व्यापकता यावी, महाराष्ट्रात गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पालकांनीही दक्षता घेत आपला पाल्य व्यसनापासून दूर राहिल याची काळजी घ्यावी़. ज्यांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन आहे, त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. आत्मविश्वास असेल तर कुठलेही व्यसन सोडणे शक्य आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे. या कायद्याची मात्र प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही़. शरीरात कोणत्याही भागात अचानक आलेली गाठ, कातडी,ओठ, जीभ आदी ठिकाणी होणारी जखम, गिळण्याचा त्रास अथवा अन्न उलटून पडणे, औषधांनी बरी न होणारी जखम, औषधांना दाद न देणारा खोकला  किंवा घशात घोगरा आवाज येणे किंवा आवाजात पडलेला फरक, अपचन, अवेळी अचानक रक्तस्त्राव, लघवी, शौचाच्या सवयीत अचानक बदल, आदी कॅन्सरची लक्षणे आहेत. सध्या कॅन्सरवरील विविध उपचारपद्धती उपलब्ध आहेत. त्यामुळे कॅन्सर झाला तर खचून न जाता कॅन्सर तज्ज्ञांकडून योग्यवेळेत उपचार घ्यावेत. वेळेत व योग्य उपचारातून अनेक कॅन्सरग्रस्त बरे झालेले आहेत. प्रत्यक्षात मात्र कॅन्सर होऊच नये यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ़ सतीश सोनवणे यांनी केले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHealthआरोग्यcancerकर्करोग