शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान-संभाजी भिडे यांच्यातील कनेक्शन उघड करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 22:01 IST

कोरेगाव-भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काही निवडक निवृत्त न्यायाधीशांशी चर्चा करून नि:पक्षपातीपणे कारवाई करावी, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व संभाजी भिडे यांच्यातील संबंध उघड करू, असा इशारा भारिप महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी नगर येथे दिला़

अहमदनगर: कोरेगाव-भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काही निवडक निवृत्त न्यायाधीशांशी चर्चा करून नि:पक्षपातीपणे कारवाई करावी, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व संभाजी भिडे यांच्यातील संबंध उघड करू, असा इशारा भारिप महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी नगर येथे दिला़पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, कोरेगाव-भीमा प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करण्यापुरते हे प्रकरण सिमित नाही़ जी भिडेंची प्रवृत्ती आहे़, तीच प्रवृत्ती करणीसेनेची आहे़ संभाजी भिडे यांना पंतप्रधानच पाठिशी घालत आहेत, असा आपला सुरुवातीपासूनचा आरोप आहे़ या दोघांच्या संबंधाचे भक्कम पुरावे आपल्याकडे आहेत़ ते सादरदेखील केलेले आहेत, असे सांगून जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील़  इथे न्याय मिळाला नाही, तर हे भांड कुठे घेऊन जायचे तिथे ते घेऊन जाऊ, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला़राज्यातील जातीय दंगलीवरही त्यांनी प्रकाश टाकला़ ते म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल प्रतिगामीकडे सुरू आहे़ राज्यातील अनियंत्रित हिंदू संघटना बेफाम झाल्या आहेत़ अनियंत्रित व नियंत्रित हिंदू संघटनांमध्ये भांडण सुरू झाले असून, त्यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे़  या भांडणाची झळ मुस्लिम, ख्रिश्चन आणि दलितांना बसत नसून, मध्यमवर्गीय सवर्ण हिंदूंनाच बसत आहे़ हिंदू संघटनांतील हे भांडण सवर्ण हिंदूंच्या दारात येऊन पोहोचले आहे़ वादाचे उत्तर कुठल्याही राजकीय पक्षाकडे नाही़ ते सवर्ण हिंदंूकडेच आहे़ त्यांनीच काय ते ठरावावे, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले़ कॉ़ बाबा आरगडे, अनंत लोखंडे, अशोक सोनवणे, अरुण जाधव, संध्या मेंढे आदी यावेळी उपस्थित होते़़़़़़शरद पवारांनी स्वत:चे राजकीय चारित्र्य तपासावेराष्ट्रीय राजकारणात राजकीय चारित्र्यवान व्यक्ती एकत्र येत असतात़  समविचारी पक्षांना एकीची हाक देणाºयांनी स्वत:चे राजकीय चारित्र्य तपासण्याची गरज आहे़ निवडणुकीनंतर सेना-भाजपा सोबत जाण्यास तयार नव्हती़  तेव्हा सर्वप्रथम राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिला होता, ही बाब विसरून चालणार नाही़  शरद पवार यांनी आपले राजकीय चारित्र्य तपासण्याची गरज आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली. संविधान बचाव रॅलीसाठी पवार यांच्यासोबत जाणार का, या पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना पवार यांचे नाव न घेता त्यांनी ही टीका केली़