शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांना सोबत घेऊ, नगर जिल्ह्याला न्याय देऊ- हसन मुश्रीफ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 13:42 IST

बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार का दिला हे माहित नाही. आपण मात्र पक्षाने दिलेला आदेश पाळत नगरचे पालकमंत्रिपद सांभाळणार असून सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याला न्याय देऊ, असे नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

लोकमत थेट संवाद / सुधीर लंके ।  मुंबई : बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार का दिला हे माहित नाही. आपण मात्र पक्षाने दिलेला आदेश पाळत नगरचे पालकमंत्रिपद सांभाळणार असून सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याला न्याय देऊ, असे नगरचे पालकमंत्रीहसन मुश्रीफ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मुंबई येथे झालेल्या लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड कार्यक्रमास मुश्रीफ हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.कोल्हापूर जिल्ह्यातील मुश्रीफ यांच्याकडे नगरच्या तर थोरात यांच्याकडे कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र आपणाकडे कुठल्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नको अशी भूमिका थोरात यांनी घेतली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री कोण होणार ? हा प्रश्न अनुत्तरित आहे. याबाबत मुश्रीफ यांना छेडले असता ते म्हणाले,  थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार का दिला? याची आपणाला  कल्पना नाही. आपली स्वत:ची मात्र नगरचे पालकमंत्री पद स्वीकारण्याची तयारी आहे. आजवर पक्षाने दिलेला आदेश आपण पाळत आलो आहोत. नगर हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असून येथे राष्ट्रवादीचे आमदारही सर्वाधिक आहेत. त्यामुळे  या जिल्ह्याच्या विकासात आपण पूर्णपणे योगदान देऊ. मी केवळ राष्ट्रवादीचा पालकमंत्री राहणार नसून महाआघाडीतील घटक पक्षांसह सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन कामकाज केले जाईल. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून सर्व तालुक्यांना न्याय मिळेल, असे धोरण घेतले जाईल. नगर जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. त्यापैकी थोरात हे ज्येष्ठ आहेत तर शंकरराव गडाख व प्राजक्त तनपुरे यांच्याशी आपले चांगले संबंध असून त्यांच्याशी संवाद उत्तम राहील याचीही आपण खबरदारी घेऊ. शिवसेना हा आमच्या आघाडीतील महत्वाचा घटक असल्याने त्यांनाही सोबत घेतले जाईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHasan Mushrifहसन मुश्रीफministerमंत्रीMaharashtraमहाराष्ट्र