शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू कशानेही होऊ द्या....वीस हजार रुपये मिळणार.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 12:03 IST

अहमदनगर : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपयांची रक्कम दिली जाते. या योजनेसाठी आधी एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता तीन वर्षांपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनाने तसे एका परिपत्रकान्वये आदेश जारी केल्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना आता लाभ घेणे शक्य होणार आहे. 

अहमदनगर : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपयांची रक्कम दिली जाते. या योजनेसाठी आधी एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता तीन वर्षांपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनाने तसे एका परिपत्रकान्वये आदेश जारी केल्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना आता लाभ घेणे शक्य होणार आहे. 

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वयोगटातील (६० वर्षांपेक्षा कमी) कर्ता स्त्री-पुरुष मरण पावल्यास त्याच्या कुटुंबीयांना एक रकमी २० हजार रुपये इतके अर्थसाहाय्य देण्यात येते. 

आतापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी मृत्युच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत अर्ज स्वीकारण्याची मुदत होती. आता ही मुदत वाढवून मृत्युच्या तारखेपासून तीन वर्षाच्या आत अर्ज स्वीकारण्यास २१ सप्टेंबर रोजीच्या आदेशाने राज्य शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार भारती सगरे यांनी दिली.

कोणाला मिळतो लाभ?कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्याने कुटुंब निराधार झाल्यासकुटुंबाचा समावेश दारिद्र्यरेषेखालील यादीत असावासंजय गांधी निराधार योजना कार्यालयात अर्ज करावामृत्यूबाबतचे वैद्यकीय अधिकाºयाचे प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंदणीचा दाखला मयत कुटुंबप्रमुख असल्याबाबत तलाठ्यांचा दाखला आधारकार्डकागदपत्रांची छाननी झाल्यावर एकरकमी २० हजार दिले जातात

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांनाही लाभकोणत्याही कारणाने कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास हा लाभ मिळतो. मात्र कोरोनामुळे अचानकपणे राज्यात हजारो जणांचा मृत्यू झालेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कोरोना बाधितांच्या मृत्युचा आकडा सातशेपार गेला आहे. यामध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबप्रमुख असतील तर त्यांच्याही कुटुंबीयांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGovernmentसरकार