शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

बिबट्या जिंकला... वनविभाग हारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 19:24 IST

पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण गावाजवळ असण-या मावळेवाडी गावच्या शिवारात प्रमोद घनवट यांच्या शेतात काल बिबट्याचे पिलू आढळून आले. मोठ्या कसरतीने गावक-यांनी या पिलाला पकडून ठेवत वनविभागाशी संपर्क साधला.

ठळक मुद्देपकडलेल्या पिलाची सुटका करण्यात बिबट्याची माता यशस्वी

शिवाजी पानमंदसुपा : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण गावाजवळ असण-या मावळेवाडी गावच्या शिवारात प्रमोद घनवट यांच्या शेतात काल बिबट्याचे पिलू आढळून आले. मोठ्या कसरतीने गावक-यांनी या पिलाला पकडून ठेवत वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाने कॅरेटमध्ये हे पिलू ठेवले अन पिंजरा तिसरीकडेच लावला. रात्री मध्यरात्रीच्या सुमारास पिलाच्या मातेने तिच्या बाळाची सुटका करत धूम ठोकली. या लढाईत बिबट्या जिंकला अन वनविभाग हारला अशीच स्थिती पाहवयास मिळाली.मावळेवाडी गावच्या शिवारात प्रमोद घनवट यांच्या शेतात काल बिबट्याचे पिलू आढळून आल्यावर निखिल शेळके, योगेश शिंदे, करण पिसाळ, तुषार शिंदे या स्थानिक तरुणांनी मोठ्या धाडसाने त्याला अलगद जेरबंद करून ठेवले. वनविभागाच्या अधिका-यांना सूचना दिल्यावर घटना स्थळी पारनेरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा भिंगे व त्याचे सहकारी पोहोचले. त्यांनी जुन्नर येथील बिबट्या बचाव केंद्रातील अधिका-यासह पिलावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनाही पाचारण केले. मावळेवाडीच्या अमृते माळ शिवारात सगळीकडे ऊस असून मोठ्या प्रमाणावर झाडे वाढलेली आहेत बिबट्याचे पिलू आजारी असल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. ते पिलू साधारणपणे 2 ते अडीच महिन्याचे असल्याचे मनीषा भिंगे यांनी सांगितले. पिलू सापडल्याने त्याला मोठ्या पिंज-यात ठेवले तर त्याची आई त्याला सोडवण्यासाठी पिंज-यात प्रवेश करील, व ती पकडली जाईल असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. परंतु तसे न करता वनविभागाने फळे भरण्याच्या एका कॅरेट मध्ये त्याला ठेवले. वरून दुसरे कॅरेट ठेवले. पिंजरा तिसरीकडेच ठेवला. त्यावर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले. परिणामी बिबट्याची मादी येऊन मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांनी तिने त्या कॅरेट मधून पिलांची सोडवणूक करून ती पसार झाली. मोठा पिंजरा तसाच बिबट्याच्या प्रतीक्षेत रिकामा राहिला. त्यामुळे आता याच परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे निश्चित झाल्याने मावळेवाडी व परिसरातील वाडेगव्हानच्या भागातील वाडी वस्तीवर राहणा-या ग्रामस्थांचे धाबे दणाणले आहेत. वनविभागाने हाताशी आलेला बिबट्या सोडून दिल्याने या भागातील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेतग्रामस्थांच्या सांगण्यानुसार बिबट्याच्या मादीसोबत अजून २ पिल्ले आहेत. त्यामुळे या एका पिलाला वाचवण्यासाठी ती पिंज-यात जाईल याची शाश्वती नाही. याउलट बंदिस्त झालेल्या पिलामुळे ती आक्रमक होऊ शकते त्यामुळे सध्या तरी तिला असे अडचणीत आणून पकडता येणे शक्य नव्हते. ग्रामस्थांनी पिंजरा लावून बिबट्या बंदिस्त करावा अशा मागणीचा ठराव करून दिल्यास त्यांची ही मागणी वरिष्ठांना कळऊन मग पिंजरा लावता येईल - मनीषा भिंगे वनपरिक्षेत्र अधिकारी, पारनेरयापूर्वी गव्हाणवडी, कुरुंद, मावळेवाडी , वाडेगव्हाण शिवारात बिबट्या दिसला होता . एकदा त्याने शेळीवर झडप घातली होती. १ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीची मासिक मिटिंग आहे त्या दिवशी मिटिंग मध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करणारा ठराव करून संबंधित अधिका-यांना दिला जाईल.- उदय कुरकुटे, सरपंच मावळेवाडी

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर