लोणीः राहाता तालुक्यातील लोणी हनमंतगाव रस्त्यावर असलेल्या स्वातंत्र्य चौकात असलेल्या ब्राह्मणे- बनसोडे वस्ती जवळ शनिवारी (दि.१९) सकाळी ६ वाजेदरम्यान नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला.
अज्ञात वाहनाच्या धडकेने हा एक वर्षाचा नर बिबट्या मृत झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.