सामाजिक कार्यकर्ते अशोक घोलप यांनी मृत बिबट्याबाबत माहिती लोणी बुद्रुक (ता. राहाता) येथील वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांना दिली. त्यानंतर वन्यजीव प्राणीमित्र म्हस्के हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी याबाबतची माहिती अहमदनगर उप वन संरक्षक अधिकारी कविता माने, सहायक उप वन संरक्षक अधिआरी रमेश देवखुळे, कोपरगाव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा पाटील, वनपाल बी. एस. गाढे यांना कळवली.
त्यानंतर दुपारी वनरक्षक जी. बी. सुरासे यांनी घटनास्थळी येऊन मृत बिबट्याचा पंचनामा केला. लोणीचे पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे यांनी मृत बिबट्याची उत्तरीय तपासणी करून राजेंद्र घोलप यांच्याच शेतामध्ये या बिबट्याला अग्नी दिला. यावेळी प्रवीण विखे, राजेंद्र घोलप, शिद्दिकेश घोलप, प्रवीण ब्राम्हणे, वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के पंच म्हणून हजर होते.
040721\img_20210704_182710.jpg
???????? ???? ??? ??????? ??????? ???????