बुधवारी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान गोरख जाधव यांच्या गोठ्यात बांधलेल्या गो-ह्यावर गोठ्यामध्ये शिरुन बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये गोऱ्हा ठार झाला. त्यानंतर या गोऱ्ह्याला दाट ज॔ंगलात ओढत नेऊन तेथे बिबट्याने फडशा पाडला. घटनेचा पंचनामा वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांच्या अधिपत्याखाली वनपरीमंडळ अधिकारी मधुकर चव्हाण व संपत करवंदे यांनी जागेवर जाऊन पंचनामा केला आहे. भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून रतनवाडी, वांरघुशी या ठिकाणीही आदिवासी शेतकऱ्यांच्या शेळ्या बिबट्याने ठार केल्या असल्याची माहिती समोर येत असून बिबट्याने आता आपले लक्ष कोंबड्यांना केले आहे. दोन ते तीन शेतकऱ्यांच्या कोंबड्याच्या खुराड्यात घुसून बिबट्याने कोंबड्या फस्त केल्या आहे. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून वाकी, वारंघुशी व रतनवाडी परिसरातील बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
भंडारदरा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST