अहमदनगर : जिल्हा परिषदेत पहिल्या अडीच वर्षात अध्यक्ष विठ्ठल लंघे यांचा कारभार पाहिला. त्यांनी अतिशय संयमाने सभागृह चालविले. मला राजकीय अनुभव नसला तरी लंघे यांना गुरू मानून पुढील राजकीय कारभार चालविणार असल्याचा विश्वास नूतन अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी व्यक्त केला.गुंड यांनी मंगळवारी त्यांच्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मावळते अध्यक्ष लंघे, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, प्रतोद शरद नवले, सदस्य राजेंद्र फाळके, नंदा वारे, शारदा भुसे, परमवीर पांडुळे, योगीता राजळे, अध्यक्ष गुंड यांचे पती राजेंद्र गुंड, दत्तात्रय वारे आदी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष गुंड म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिलांना स्वावलंबी करण्यावर आपला भर राहणार आहे. मावळते अध्यक्ष लंघे यांनी त्यांच्याकाळात अनेक अध्यक्ष पाहिलेले आहेत. मी केवळ लंघे यांचे कामकाज पाहिलेले आहे. त्यांनी अडीच वर्षात महिलांसह सर्व जिल्हा परिषद सदस्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला. हे काम पुढे आपण सुरू ठेवणार आहे. असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.मंगळवारी जिल्हा परिषदेची कृषी आणि पशुसंवर्धन समितीची सभा होती. मात्र, सदस्यांनी या सभेला दांडी मारल्याने सभा तहकूब करण्यात आली असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी विलास नलगे आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी.बी. राठोड यांनी दिली.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शेलार यांना पदभार स्वीकारण्यासाठी बुधवारचा मुहूर्त मिळाला आहे. सकाळी अकरा वाजता विधीवत पूजा करून ते पद्भार स्वीकारणार आहेत. आचारसंहिता असल्याने या पदाधिकाऱ्यांना कामकाजाला सुरूवात करता येणार नाही.
लंघेंना गुरू मानूून कारभार
By admin | Updated: September 30, 2014 23:19 IST