शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुळा नदीतून जायकवाडीला पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 16:53 IST

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या मुळा धरणातून नदीपात्राव्दारे पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाकडे २ हजार ५१७ द.ल.घ.फू. पाण्याचा विसर्ग ...

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या मुळा धरणातून नदीपात्राव्दारे पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाकडे २ हजार ५१७ द.ल.घ.फू. पाण्याचा विसर्ग झाला आहे. पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाण्याची आवक घटली आहे.२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या मुळा धरणाचे दरवाजे यंदा परतीच्या पावसामुळे दोनदा उघडावे लागले. धरणाकडे कोतूळ येथून ११५८ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. कोतूळ येथे यावर्षी ८४४ मिलिमीटर तर मुळानगर येथे ६०२ मि.मी.पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने २० ते २४ आॅक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता वर्तविली आहे. मुळा नदीतून सध्या २ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी पात्रातील डिग्रस, मांजरी, मानोरी, वांजुळपोई येथे पहिल्या टप्प्यात फळ्या टाकण्यात आल्या आहेत. पाऊस उघडल्याने मंगळवारी पाण्याचा विसर्ग कमी करण्याची शक्यता आहे. नदीतून पाणी वाहिल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

विहिरींची पाणी पातळी वाढली

मुळा नदी पात्रातून पाणी वाहून गेल्यामुळे नदी काठ परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढली. नदी पात्र परिसरात मुख्य पीक ऊस असल्याने पुढील महिन्यात उसाच्या लागवडी वाढण्याची शक्यता आहे. मुळा धरण भरल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर