पोलीस अधीक्षक पाटील यांनी पदभार घेण्याच्या आधी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत अपघात, मालमत्ता व शरीराविरोधातील बहुतांशी गुन्हे उशिराने दाखल होत होते. ही बाब पाटील यांच्या निदर्शनास आली. याबाबत अधीक्षक पाटील यांनी गुन्ह्याच्या दैनंदिन अहवालाचे अवलोकन करून संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत चौकशीचे आदेश देत विलंबाचे कारण विचारले गेले. अपघात व शरीराच्या विरुद्धच्या गुन्ह्यांत वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत करण्याची जबाबदारी स्टेशन डायरी अंमलदाराची आहे. मालाविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये अनावश्यक कागदपत्रांची मागणी न करता तसेच प्राप्त होणाऱ्या तक्रारीमध्ये सदरचा गुन्हा हा दखपात्र स्वरूपाचा आहे का नाही, याबाबत संभ्रम असल्यास ललितकुमार विरुद्ध शासन या न्यायनिवाड्याचा आधार घेत उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन प्रभारींना तात्काळ गुन्हे दाखल करून घेण्याचे सांगण्यात आले. ऑक्टोबर २०२० अखेर जिल्ह्यात एकूण २४५ गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, नोव्हेंबर २०२० अखेर मागील महिन्याच्या तुलनेत उशिराने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण ११२ ने कमी झाले आहे.
उशिराने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण घटले
By | Updated: December 9, 2020 04:16 IST