शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

लांडे खून प्रकरण : भानुदास कोतकरला जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:20 IST

अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेप झालेला भानुदास कोतकर याला मुंबई हायकोर्टाने आज, सोमवारी (दि़ २६) जामिन मंजूर केला आहे. मात्र, हा जामिन देताना न्यायालयाने कोतकरला नगरमध्ये जाण्यास तसेच परदेशात जाण्यास मज्जाव केला आहे. 

अहमदनगर : अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेप झालेला भानुदास कोतकर याला मुंबई हायकोर्टाने आज, सोमवारी (दि़ २६) जामिन मंजूर केला आहे. मात्र, हा जामिन देताना न्यायालयाने कोतकरला नगरमध्ये जाण्यास तसेच परदेशात जाण्यास मज्जाव केला आहे. आजारपणाच्या उपचारासाठी हा जामिन मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण

नगरच्या अशोक लांडे खून प्रकरणात भानुदास कोतकर, त्याची तीन मुले माजी महापौर संदीप याच्यासह सचिन व अमोल यांना दोषी ठरवत या चौघांना जन्मठेप सुनावली होती. या प्रकरणातील अन्य आरोपी स्वप्निल पवार व वैभव अडसूळ यांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. तर संशयित भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक भीमराज लांडे याचा १९ मे २००८ रोजी केडगावमध्ये मारहाण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी घटनेतील साक्षीदार शंकरराव राऊत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०१३ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसार हा खटला पुढे नाशिक न्यायालयात वर्ग करण्यात आला. या प्रकरणात भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर, नगरचे माजी महापौर संदीप कोतकर, सचिन व अमोल कोतकर यांच्यासह एकूण १५ जणांवर दोषारोपपत्र ठेवण्यात आले. नाशिकचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. कदम यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन सहा जणांना दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने भानुदास कोतकर व त्याच्या तीन मुलांना जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तर भानुदास कोतकरला तीन वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपयांचा दंड तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी स्वप्निल पवार आणि वैभव अडसूळ यांना दोषी धरत दोन वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. उर्वरित नऊ संशयितांची पुराव्यांअभावी मुक्तता करण्यात आली. त्यात भाजप आमदार कर्डिले यांचा समावेश आहे. कर्डिले यांच्यावर मयताच्या कुटुंबीयांना आर्थिक देवाणघेवाणीचे आमिष दाखविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHigh Courtउच्च न्यायालय