शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसानंतर धावली ‘लालपरी’; नगर विभागाचे २ कोटी ५० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 17:34 IST

बसेस सुरु होताच बसस्थानकांमधील गर्दी वाढू लागली. बस सुरु झाल्याची माहिती मिळताच शहरातील माळीवाडा बसस्थानकात भाऊबिजेसाठी जाणा-या भगिनींची मोठी गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आगार व्यवस्थापकांनी दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती.

अहमदनगर : न्यायालयाच्या आदेशानंतर एस. टी. महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेला बंद पाचव्या दिवशी मागे घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाच दिवसानंतर एस. टी. बस धावू लागली. दरम्यान बंदच्या काळात महामंडळाच्या नगर विभागाचे तब्बल दोन कोटी ५० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. तर जे कर्मचारी संपात सहभागी होते, त्यांची बिनपगारी रजा लावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.एस. टी. महामंडळाच्या कर्मचा-यांनी विविध मागण्यांसाठी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. जिल्ह्यातील ११ आगारांमधील ६५० बसेसला बे्रक लागला होता. त्यामुळे दिवाळीच्या सणाला जाणारे-येणा-या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. तर ग्रामीण भागातील हक्काचे प्रवासी वाहन असलेल्या लालपरीला बे्रक लागल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे हाल झाले. काही ठिकाणी खासगी वाहनांचा आधार लोकांनी घेतला तर काही ठिकाणी खासगी वाहनेही उपलब्ध नसल्यामुळे ऐन सणासुदीत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. संपादरम्यान खासगी वाहतुकीचेही दर वाढविण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसली़ एकीकडे प्रवाशांना मोठी झळ सहन करावी लागली असतानाच महामंडळालाही २ कोटी ५० लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संपाच्या काळातील चालक-वाहकांच्या रजा गृहित धरण्यात येणार असून, या रजाही बिनपगारी लावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.शनिवारी (दि. २१) पहाटेपासून महामंडळाच्या तारकपूर आगारातून लांबपल्ल्याची गाड्या सोडण्यात आल्या. तर तालुकास्तरावरील आगारातून स्थानिक बसगाड्या सोडण्यात आल्या. बसेस सुरु होताच बसस्थानकांमधील गर्दी वाढू लागली. बस सुरु झाल्याची माहिती मिळताच शहरातील माळीवाडा बसस्थानकात भाऊबिजेसाठी जाणा-या भगिनींची मोठी गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आगार व्यवस्थापकांनी दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरST Strikeएसटी संपstate transportएसटी