शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

नाशिक-पुणे महामार्गावर ‘लाल चिखल’; भाव कोसळल्याने टोमॅटो ओतले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 16:45 IST

संगमनेर : शनिवारी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक झाली़ मात्र, दर अचानक कोसळल्याने संतप्त झालेल्या ...

संगमनेर : शनिवारी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक झाली़ मात्र, दर अचानक कोसळल्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी पुणे-नाशिक महामार्गावर टोमॅटो ओतून रास्ता रोको आंदोलन केले़ रस्त्यावरच टोमॅटोचा लाल चिखल करुन शेतक-यांनी आपला रोष व्यक्त करीत भाव वाढीची मागणी केली़शनिवारी संगमनेरचा आठवडे बाजार भरतो़ बाजारामुळे टोमॅटोला चांगला भाव मिळेल, या आशेने परिसरातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजार समितीत विक्रीसाठी आणले होते. बकरी ईद असल्याने अनेक व्यापा-यांनी आपले लिलाव बंद ठेवले होते. त्यामुळे टोमॅटोचे भाव ६०० ते ७०० रुपयांवरून थेट २०० ते ३०० रूपयांपर्यंत घसरले़ अचानक कमी झालेल्या भावामुळे संतप्त शेतक-यांनी बाजार समिती समोरच वाहने आडवी लावत रास्ता रोको सुरू केला. यामुळे काही काळ महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अचानक भाव कोसळल्याने तालुक्यातील विविध गावातील शेतक-यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकत आपला रोष व्यक्त केला. वातावरण तणावपूर्ण बनल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, पोलीस उपनिरीक्षक शंकरसिंग रजपूत हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच तहसीलदार साहेबराव सोनवणे हे देखील घटनास्थळी आले़ त्यांनी शेतकºयांची समजूत काढत रास्ता रोको मागे घेण्यास शेतक-यांना भाग पाडले़