शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या ‘लक्ष्मी’साठी आंध्र प्रदेशातून झावळ्या, पारंपरिक व्यवसाय अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 05:47 IST

यंदा दिवाळीवर दुष्काळाचे सावट आहे. याचा परिणाम दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात महत्त्वाचे स्थान असलेल्या लक्ष्मी (झाडणी) बनविण्याच्या व्यवसायावर झाला आहे.

- बाळासाहेब काकडेश्रीगोंदा (जि.अहमदनगर) -  यंदा दिवाळीवर दुष्काळाचे सावट आहे. याचा परिणाम दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात महत्त्वाचे स्थान असलेल्या लक्ष्मी (झाडणी) बनविण्याच्या व्यवसायावर झाला आहे. ही लक्ष्मी बनविण्यासाठी लागणारी शिंदाडाची झाडे महाराष्ट्रात दुर्मीळ झाली आहेत. परिणामत: शिंदाडाच्या झावळ्या आंध्रप्रदेशातून आणाव्या लागल्याने बाजारपेठेत लक्ष्मीचा भाव वधारला आहे.श्रीगोंदा तालुक्यात वडाळी, कोळगाव, लोणी व्यंकनाथ येथे लक्ष्मी बनविणारे कारागीर आहेत. दिवाळी लक्ष्मीपूजनासाठी लागणारी लक्ष्मी बनविणे हा मातंग समाजाचा पारंपरिक व्यवसाय होता. पूर्वी मातंग समाजात घरोघर लक्ष्मी तोरण बनविले जात होते. दसऱ्याला आंब्याच्या पानाचे तोरण व दिवाळीला शेतकरी व व्यापाºयांना लक्ष्मी दिली जाते. त्या मोबदल्यात शेतकरी, व्यापारी कारागिरांना धान्य मिठाई देत असत, त्याला आसामी असे म्हणत.अलिकडच्या काळात आसामी संपल्यावर सर्व व्यवहार पैशावर सुरू झाला. दिवाळी अगोदर दोन महिन्यांपासून लक्ष्मी बनविण्यास जास्त गती येते. पण पाणी टंचाईमुळे शिंदाडाची झाडे नष्ट झाली. त्यामुळे मातंग समाजाचा घरोघरचा लक्ष्मी बनविण्याचा व्यवसाय अस्तंगत होऊन आता त्याला व्यावसायिक स्वरुप आले आहे.व्यवसाय परवडत नाहीपूर्वी गावात ओढ्याला शिंदाडाची झाडे होती. त्यामुळे लक्ष्मी बनविण्यासाठी गावातच पाने मोफत उपलब्ध होत होती. गेल्या काही वर्षांपासून शिंदाडाची झाडे संपली आहेत. त्यामुळे आंध्रप्रदेशातून ही पाने आणावी लागतात. हा व्यवसाय परवडत नाही. पण काटकसर करून वर्षभराच्या उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय करावा लागतो.- बाळासाहेब काळे, कोळगाव.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Ahmednagarअहमदनगर