शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लेकराची आर्त हाक बापाला ऐकू गेली नाही़; विषाचा प्याला पिऊन त्याने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 16:54 IST

शेतात राबराब राबणा-या बापाला त्याचा चिमुकला लेक रोज भरल्या डोळ्याने पाहत होता़. बापाचे हेच कष्ट त्याने शब्दबद्ध केल. अन् शाळेत ‘अरे बळीराजा नको करू आत्महत्या’ ही कविता सादर केली. ज्या दिवशी मुलाने कविता सादर केली त्याच रात्री बापाने विष पिऊन आत्महत्या केली. 

टाकळी मानूर/कोरडगाव: शेतात राबराब राबणा-या बापाला त्याचा चिमुकला लेक रोज भरल्या डोळ्याने पाहत होता़. बापाचे हेच कष्ट त्याने शब्दबद्ध केल. अन् शाळेत ‘अरे बळीराजा नको करू आत्महत्या’ ही कविता सादर केली. ज्या दिवशी मुलाने कविता सादर केली त्याच रात्री बापाने विष पिऊन आत्महत्या केली. लेकाची आर्त हाक बापाला ऐकायलाच गेली नाही. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी या गावात घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. मल्हारी बाबासाहेब बटुळे (वय ३१) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतक-याचे नाव आहे़ भारजवाडी येथील हनुमाननगर जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी (दि़.२७) मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी कविता वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मयत मल्हारी यांचा मुलगा प्रशांत हा इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेतो. या कार्यक्रमात प्रशांत याने ‘शेतात कष्ट करूनही तुज्या डोक्याला ताप, आरे बळीराजा नको करू आत्महत्या, पैसे नसूनही शाळेत शिकवता लेकरं, कसे उन्हात करतात. शेती पीक उगवणी मिळतात. पैसे, शेती करुनही तुज्या हाताला फोड आरे बळीराजा नको करू आत्महत्या’ ही कविता सादर करून शेतक-यांची व्यथा आणि वेदना मांडली होती. उपस्थितांनी प्रशांतच्या कवितेचे कौतुक केले. ‘बळीराजा’ आत्महत्या करू नको.. असे आवाहन करणा-या प्रशांतचा आवाज मात्र त्याच्या बापापर्यंत पोहोचला नाही़. प्रशांतचे वडील मल्हारी बटुळे यांनी गुरुवारी रात्री विष पिऊन आत्महत्या केली. कर्जबाजारीपणामुळे मल्हारी यांनी आत्महत्या केल्याची गावात चर्चा आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीfarmer suicideशेतकरी आत्महत्या