शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

शिर्डीत साई संस्थानच्या रुग्णालयात कोविड सेंटर होणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची ‘लोकमत’ला ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 13:09 IST

साईबाबा संस्थान व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत कोवीड केअर सेंटर उत्तमपणे सुरू आहे़ मात्र आता वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभुमीवर या सेंटरवरच न थांबता कोवीड रूग्णालय सुरू करण्याची निकड निर्माण झाली आहे़ जनसामान्यांशी निगडीत असलेल्या या संवेदनशील बाबीकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते़ या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी साईसंस्थानने अद्याप कोवीड हॉस्पीटल सुरू न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले़ आपण याबाबत तातडीने अहमदनगर जिल्हाधिकाºयांना सूचना करणार असल्याचेही टोपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

प्रमोद आहेर  

 शिर्डी : साईबाबा संस्थानच्या रूग्णालयात तातडीने कोवीड हॉस्पीटल सुरू करण्याच्या सूचना आपण अहमदनगर जिल्हाधिकाºयांना तत्काळ देणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

साईबाबा संस्थान व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत कोवीड केअर सेंटर उत्तमपणे सुरू आहे़ मात्र आता वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभुमीवर या सेंटरवरच न थांबता कोवीड रूग्णालय सुरू करण्याची निकड निर्माण झाली आहे़ जनसामान्यांशी निगडीत असलेल्या या संवेदनशील बाबीकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते़ या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी साईसंस्थानने अद्याप कोवीड हॉस्पीटल सुरू न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले़ आपण याबाबत तातडीने अहमदनगर जिल्हाधिकाºयांना सूचना करणार असल्याचेही टोपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

सध्या शिर्डीतील कोवीड केअर सेंटरमध्ये लक्षणे नसलेल्या रूग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात येतात़ सध्या तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोनशेचा टप्पा पुर्ण केला आहे तर शिर्डीही शंभरीच्या उंबरठ्यावर आहे़ येथील सेंटरमधून लक्षणे असलेल्या व्यक्तींना लोणी किंवा नगरला पाठवण्यात येते़ मात्र सध्या ही दोन्ही ठिकाणे हाऊसफुल आहेत़ नगरला रूग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे़ खासगी रूग्णालयात पैसे मोजूनही हातापाया पडावे लागत आहे़ तेथील उपचार परवडणारे नाहीत़त्यामुळे शिर्डीतील कोवीड सेंटरचे रूपांतर आता कोवीड हॉस्पीटलमध्ये करण्याची सामाजिक गरज निर्माण झाली.साईसंस्थानच्या दोन्ही रूग्णालयापैकी एका ठिकाणी, यातील एखाद्या विभागात किंवा द्वारावती, साईआश्रम येथे हॉस्पीटल सुरू करणे शक्य आह. साईसंस्थानकडे पुरसे व्हेंटीलेटर व आॅक्सिजनची व्यवस्था आहे. संस्थानकडे डॉक्टरांची व नर्सेसची कमतरता आहे़ संस्थांनने पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली व शासनाने परिसरातील शासकीय किंवा खाजगी डॉक्टरांची सेवा घेवून हे हॉस्पीटल सुरू करता येवू शकते़ यामुळे तालुका व परिसरातील रूग्णांना पुढील उपचारासाठी वणवण करावी लागणार नाही.

रूग्णसेवा हीच साईबाबांची प्रथम शिकवण आहे, प्रसंगी बाबांनी रूग्णांचे आजार स्वत:वर घेवुन रूग्णांना व्याधी मुक्त केल्याची उदाहरणे आहे.यामुळे अशा महामारीच्या काळात साईबाबांचा वारसा जपणाºया संस्थानला ही रूग्णसेवेची मोठी संधी आहे़ यासाठी भाविकही मदतीला नक्की पुढे येतील. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीcorona virusकोरोना वायरस बातम्या