शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी खटल्यातील आरोपींवर दोष सिद्ध, 21 तारखेला अंतिम निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 12:02 IST

राज्यभर गाजलेल्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची अंतिम सुनावणी नगर जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु झाली आहे. आरोपींवरील दोष सिद्ध झाले आहेत.

ठळक मुद्देनगर जिल्हा व सत्र न्यायालयात कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची अंतिम सुनावणीतिन्ही आरोपींना पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले आहेसुनावणीच्या पार्श्वभूमीवर नगर शहर व कोपर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेनिकालाकडे संपुर्ण राज्याचं लक्ष

अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची अंतिम सुनावणी नगर जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु झाली आहे. आरोपींवरील दोष सिद्ध झाले आहेत. कोपर्डी खटल्याची अंतिम सुनावणी 21 तारखेला होणार आहे.  या घटनेतील तिन्ही आरोपींना पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले आहे.कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय २९), संतोष गोरख भवाळ (२९) व नितीन गोपीनाथ भैलुमे (२८) यांना अटक करुन त्यांच्याविरोधात सबळ पुरावे मिळवून दोषारोप पत्र ठेवले होते. याची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या पीठापुढे झाली. आरोपी व सरकारी पक्षाने आपापल्या बाजू मांडल्या असून, साक्षीपुरावे तपासून आज आरोपींवरील दोष सिद्ध होण्यासाठी थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर नगर शहर व कोपर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.न्यायालयातील बंदोबस्त पोलीस उपाधीक्षक अशोक थोरात तर कोपर्डी येथील बंदोबस्त श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या नियंत्रणाखाली तैनात करण्यात आला आहे.खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन न्यायालय व्यवस्थापनाने बाहेरील नागरिकांसाठी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था केली आहे. हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयातही मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे न्यायालयासह नगर शहर व कोपर्डीत बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. नगर शहरातील बंदोबस्त सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या नियंत्रणाखाली आहे. अपर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील बंदोबस्तावर देखरेख करत आहेत.बंदोबस्त अधिकारी व बीडीएस पथकाने न्यायालय परिसराची तपासणी केली असून, शनिवारी न्यायालयात प्रवेश करणा-या व्यक्ती व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. आरोपींवर न्यायालय परिसरात आधी तीन वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरkopardi caseकोपर्डी खटलाCourtन्यायालय