शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कोपरगावच्या नगराध्यक्षांची पदरमोड करुन दिला सफाई कामगारांना अतिरिक्त मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 17:16 IST

कोपरगाव : नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी ‘लोकमत’ने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेत बुधवारी सफाई कामगारांची बैठक घेतली. कचरा उचलणा-यास ...

कोपरगाव : नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी ‘लोकमत’ने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेत बुधवारी सफाई कामगारांची बैठक घेतली. कचरा उचलणा-यास प्रत्येकी २०० रूपयांप्रमाणे वहाडणे यांनी स्वत: पदरमोड करून अतिरिक्त कामाचा मोबदला दिल्याने कामगारांना दिवाळी भेट मिळाली.नगरपालिकेने ‘आस्था’ या संस्थेला घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका दिला होता. वर्षभर काम करून ऐन दिवाळीत ठेकेदार घंटागाड्या घेऊन अचानक निघून गेला. त्यामुळे शहरात सर्वत्र अस्वच्छता वाढून कचरा साचला. या संदर्भात ‘लोकमत’ने ‘दिवाळीत कोपरगावकरांची कचरा कोंडी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत बुधवारी सकाळी वहाडणे यांनी आरोग्य निरीक्षक पी.एम. चव्हाण यांच्या समवेत ठेकेदाराच्या सफाई कामगारांची पालिकेत बैठक घेतली. त्यांना दिवसभर कचरा उचलण्याचे आवाहन करून स्वत:च्या खिशातून प्रत्येकी २०० रूपयांचा अतिरिक्त कामाचा मोबदला दिला. रात्री दहा वाजेपर्यंत शहर स्वच्छतेचे काम सुरू होते. वहाडणेंच्या दातृत्वाने सणाच्या पूर्वसंध्येला सफाई कामगारांना दिवाळी भेट मिळाली आहे.

शहरात रोज १५-१६ मेट्रिक टन कचरा

शहरात दररोज १५-१६ मेट्रिक टन कचरा संकलित होतो. नगरपालिकेचे एकूण ११८ तर ठेकेदाराचे ११५ सफाई कामगार आहेत. पालिकेच्या १० घंटागाड्या, १ डंपर व २ ट्रॅक्टरद्वारे कचरा उचलला जातो. सर्व घंटागाड्यांना जी. पी. आर. एस. प्रणाली बसविली जाणार आहे.

शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग वापरल्या जातात. त्यामुळे गटारी तुंबतात. जनावरे कॅरीबॅगा खाऊन मरतात. १ जानेवारीपासून शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. लोकसहभागातून १० हजार कापडी पिशव्या वाटल्या जातील. लोकहिताच्या या उपक्रमास व्यापारी महासंघाची साथ मिळाली आहे.- विजय वहाडणे, नगराध्यक्ष

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव