शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कोपर्डी बलात्कार-खून खटल्यातील मारेक-यांना फाशी की जन्मठेप? बुधवारी फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 20:39 IST

राज्यभर गाजलेल्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याचा बुधवारी जिल्हा न्यायालयात निकाल लागणार असून, निर्भयाच्या मारेक-यांना जन्मठेप मिळते की फाशीची शिक्षा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याचा बुधवारी जिल्हा न्यायालयात निकाल लागणार असून, निर्भयाच्या मारेक-यांना जन्मठेप मिळते की फाशीची शिक्षा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.निकालानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हा न्यायालयासह, नगर शहर, कोपर्डीत मोठा बंदोबस्त तैनात राहणार आहे. कोपर्डी खटल्यातील मुख्य आरोपी पप्पू उर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे, (वय २५), संतोष गोरख भवाळ (वय ३०) व नितीन गोपीनाथ भैलुमे (वय २६) यांच्यावर १८ नोव्हेंबर रोजी न्यायालयात (कलम ३७६), खून करणे (३०२) व छेडछाड करणे (कलम ३५४) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ६, ८ व १६ प्रमाणे दोष सिद्ध झाला आहे. या कलमातंर्गत फाशी अथवा जन्मठेपेच्याच शिक्षेची तरतूद आहे. या खटल्यातील सर्व न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्याने आता केवळ निकाल देणे बाकी आहे. बुधवारी दुपारी बारापर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. बाहेरील उपस्थितांना निकाल ऐकता यावा, यासाठी ध्वनीक्षेपकाची व्यवस्था करण्यात येणार आहे.कोपर्डी येथील नववीत शिकणारी निर्भया (नाव बदललेले आहे) गतवर्षी १३ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भाजीचा मसाला आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. रस्त्याने जात असताना वाटेत तिची सायकल अडवून रस्त्याच्या कडेला तिच्यावर अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCourtन्यायालयkopardi caseकोपर्डी खटला