शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

रस्त्यावर उतरून कोपर्डी हत्याकांडाचा निषेध

By admin | Updated: July 19, 2016 00:06 IST

अकोले : कर्जत तालुक्यातील कोपर्डी अत्याचार, हत्याकांड प्रकरणी तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले.

अकोले : कर्जत तालुक्यातील कोपर्डी अत्याचार, हत्याकांड प्रकरणी तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले. जवळपास अडीच-तीन तास चक्का जाम झाल्यानंतर पोलिसांना सामूहिक निवेदन देण्यात आले. तसेच सर्व पक्ष व संघटनांनी पुकारलेल्या शहर बंदला व्यापाऱ्यांनी सक्रिय प्रतिसाद देत सोमवारी दिवसभर कडकडीत बंद पाळला.अत्याचार करणाऱ्या त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी, काँग्रेस, माकप, भाकप, भाजपा, सेना, आरपीआय, शेतकरी संघटना आदी कार्यकर्त्यांनी केली. मराठा महासंघ व मराठा सेवा संघाच्या वतीनेही निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जालिंदर वाकचौरे, अ‍ॅड. वसंत मनकर, पंचायत समितीच्या सभापती अंजना बोंबले, राष्ट्रवादीचे तालुका सचिव यशवंत आभाळे, विकास शेटे, माकपचे कॉम्रेड डॉ. अजित नवले, भाकपचे कॉम्रेड अ‍ॅड. शांताराम वाळुंज, सेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, माधव तिटमे, अनिता मोरे-धुमाळ, आरपीआयचे विजय वाकचौरे, मराठा महासंघाचे रावसाहेब दळवी, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, सोमनाथ नवले, राष्ट्रीय कॉंग्रेसचे विनोद हांडे, विलास आरोटे, नगरसेविका सोनाली नाईकवाडी-धुमाळ, समता परिषदेचे प्रमोद मंडलिक, नगरसेवक सचिन शेटे, नामदेव पिचड, जनलक्ष्मीचे अध्यक्ष भाऊपाटील नवले, शंभू नेहे, भाऊसाहेब वाकचौरे, ईश्वर वाकचौरे, प्रदीप हासे, राज गवांदे, किरण चौधरी, मीना देशमुख आदींसह नागरीक उपस्थित होते. दरम्यान सोमवारी राहाता, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव आदी तालुक्यात विविध ठिकाणी बंद व निषेध सभा घेत कोपर्डी घटनेचा निषेध करण्यात आला़ राहत्यात निषेध मोर्चा राहाता : राहाता येथेही सर्व पक्षीयांच्या वतीने निषेध मोर्चा काढून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. सकाळी दहा वाजता राहाता येथील विरभद्र मंदिरापासून राहाता पोलीस स्टेशनवर मोर्चा नेण्यात आला.नगराध्यक्षा पुष्पा सोमवंशी, कैलास कोते, कैलास सदाफळ , संदीप दंडवते , सचिन चौगुले, सचिन तांबे, भिमराज कुदळे, अंकुश भडांगे, राजेंद्र बावके, प्रदीप बनसोडे, ताराचंद कोते, सोमनाथ गाडेकर, नाना बावके, सुमन वाबळे, सुनीता टाक, साहेबराव कुदळे, संजय सदाफळ यांच्यासह शेकडो नागरिक या वेळी उपस्थित होते. दरम्यान ११ वाजता राहाता शहारातील विद्यार्थी व युवा ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध करीत आरोपीला फाशीचा शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन राहाता येथील निवासी तहसीलदार अभिजीत बारवकर यांना दिले. महिला सुरक्षेबाबतशासन कुचकामीश्रीरामपूर : राज्यातील भाजप सरकार हे महिला सुरक्षेबाबत कुचकामी असल्याची टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी केली. कोपर्डी घटनेचा निषेध नोंदवित लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात जनतेला अच्छे दिन व सुरक्षेची हमी देणारे भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर कोठे गेले असा सवाल ससाणे यांनी केला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था कोलमडल्याचे उदाहरण कोपर्डीच्या निमित्ताने समोर आल्याचे ससाणे यांनी पत्रकात म्हटले आहे. निर्भयासारख्या घटनेवर राजकारण करणारे तेव्हाचे विरोधक व आताचे सत्ताधारी सरकार कोपर्डीच्या घटनेने जनतेला काय जबाब देतील असा प्रश्न विचारात ससाणे यांनी या घटनेचा निषेध केला.काळ्या फिती लावून निषेध कोपरगाव : कोपर्डी(ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काळ्या फिती लावून सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेवून निवेदन देण्यात आले. सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गौतम बँकेपासून दुचाकी रॅलीद्वारे तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. या ठिकाणी तालुकाध्यक्ष माधव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून संबंधीत खटला ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार प्रशांत खेडेकर यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा आढाव, दिनार कुदळे, फकिरमहंमद कुरेशी, चारूदत्त सिनगर, सागर लकारे, योगेश खालकर, योगेश जगताप, चंद्रशेखर म्हस्के, राजेंद्र वाकचौरे, राजेंद्र आभाळे, बाळासाहेब रूईकर, संतोष टोरपे, निखील डांगे, विशाल निकम, मुकूंद इंगळे, विरेन बोरावके, रवी आहेर आदी उपस्थित होते. दरम्यान शिवसेना उपजिल्हाप्रमूख कैलास जाधव यांनी तहसीलदारांना निवेदन देतअल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार करून खून केल्याच्या घटनेचा शहर व तालुका शिवसेना व युवा सेनेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला़ याप्रसंगी एस.टी. कागमार सेनेचे किरण बिडवे, नगरसेवक हाजी महेमूद सय्यद, उपतालुकाप्रमुख सलीम पठाण, उपशहरप्रमूख असलम शेख, सागर जाधव, योगेश बागूल, कोतारी पतसंस्थेचे अध्यक्ष मल्हारी देशमुख, ज्ञानेश्वर गोसावी, मतीन चोपदार, वसीम चोपदार, विक्रम झावरे, तोसीन सय्यद आदी उपस्थित होते. तहसीलदारांना निवेदन राहुरी : राहुरी तालुक्यातील विविध संघटनेच्या वतीने तहसीदार अनिल दौंडे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन सादर करण्यात आले़शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस, छावा संघटना, शिवप्रहार संघटना आदींच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, माजी सभापती शिवाजी गाडे, साहेबराव तनपुरे, देवेंद्र लांबे, रविंद्र मोरे, सुरेंद्र थोरात, शरद बाचकर आदींच्या सह्यांचे निवेदन सादर करण्यात आले़ शिवप्रहार संघटना मंगळवारी राहुरी येथे रस्तारोको आंदोलन करणार आहे. कोल्हार बंदकोल्हार : या घटनेचा कोल्हारमध्ये दिवसभर बंद पाळून निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय सभेत कार्यकर्त्यांनी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली. मराठा महासंघ, शिवप्रहार संघटना, मनसे आदी पक्ष, संघटनेच्या वतीने निषेध सभेचे आंदोलन करण्यात आले. माधवराव खर्डे चौकात निषेध सभा झाली. माजी सरपंच सुरेंद्र खर्डे, अशोकराव आसावा, उपसरपंच स्वप्नील निबे यांनी भावना व्यक्त केल्या. शिवा निकुंभ, भगवतीपूरचे सरपंच रावसाहेब खर्डे, अनिल बांगर, संभाजी देवकर, बब्बाभाई शेख, स्वप्नील गावडे, अशोक दातीर, पंढरी खर्डे, नितीन देवकर, वसंत मोरे, राजेंद्र खर्डे आदी यावेळी उपस्थित होते. आरोपीला फाशी देण्याची मागणीश्रीरामपूर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे घडलेल्या घटनेचा निषेध करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर व सेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे. अल्पवयीन मुलीचा अमानुष छळ करून तिची हत्या करण्यात आली. समाजामध्ये पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. पिडितेच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी तसेच कुटुंबियांना न्याय मिळण्याकामी विशेष सरकारी वकिल म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी मगर यांनी केली आहे. शहराध्यक्ष मनोहर नरोडे, अमोल काळे, कुणाल इंगळष, सुनील संसारे, सोमनाथ पटाईत, सिध्दार्थ त्रिभुवन, विश्वास भोसले, अर्जुन शरणागते, उमेश निळे, राजू एडके, विकास पोटफोडे, गौतम तायड, अमोल दाभाडे, रुपचंद पावसे,गणेश पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)