अहमदनगर : नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा गावातील धनगरवाडी येथील सैन्यदलातील विश्वास भाऊसाहेब कोळेकर ( ३०) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.विश्वास कोळेकर हे सैन्यदलात जम्मू-काश्मिरमध्ये कार्यरत होते. ते नुकतेच सुटीसाठी गावी आले होते. शुक्रवारी रात्री अचानक त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांना उपचारासाठी पुणे येथील सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. शनिवार(दि.१) जून रोजी सायंकाळी त्यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.२००७ मध्ये बेळगाव येथे झालेल्या भरतीमधून ते सैन्यदलात दाखल झाले होते. आतापर्यत त्यांची ११ वर्षे सेवाझाली होती. अचानक निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक वर्षाचा मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे.वडील भाऊसाहेब कोळेकर यांनीही सैन्यदलात कर्तव्य बजावले. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. सासरे लक्ष्मण कारंडे हेही सध्या सैन्यात कार्यरत आहेत.
सैन्यदलातील विश्वास कोळेकर यांचा दुर्देवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:52 IST