शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पतंग उडवण्यातही आले आता ‘राजकारण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:10 IST

विधानसभा निवडणुकीत राजकारण ढवळून निघाले. यात अनेकांचे उडणारे पतंग कापण्यात आले. अगदी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ स्थापन होईपर्यंत ही काटाकाटी दिसून आली. पतंगाच्या रूपाने राजकीय मैदानात दिसणारी ही काटाकाटी आता थेट आसमंतात चालणार आहे.

योगेश गुंड । केडगाव : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजकारण ढवळून निघाले. यात अनेकांचे उडणारे पतंग कापण्यात आले. अगदी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ स्थापन होईपर्यंत ही काटाकाटी दिसून आली. पतंगाच्या रूपाने राजकीय मैदानात दिसणारी ही काटाकाटी आता थेट आसमंतात चालणार आहे. पतंगाचा नवा नगरी राजकीय ट्रेंड सध्या भलताच फेमस होत आहे.संक्रांत जवळ आली की सारे आकाश रंगीबेरंगी पतंगांनी गजबजून जाते. नगरमध्ये पतंग उडवण्याची जुनी परंपरा आहे. खास शौकीन पतंग उत्सव साजरा करतात. सध्या बागडपट्टी, दिल्लीगेट भागात विविध प्रकारच्या पतंगांचे स्टॉल सजले आहेत. येथे दरवर्षी पतंग व्यवसायातून लाखो रूपयांची उलाढाल होत असते. पतंगाचा मौसम आला की नगरमध्ये नवनवीन ट्रेंड पतंगातून बाजारात येतात. तोच ट्रेंड नंतर राज्यभर फेमस होतो, असे येथील पतंग व्यावसायिक सांगतात. राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या . यात पतंगाप्रमाणेच अनेक राजकीय नेत्यांची व पक्षांची सत्तेपासून काटाकाटी करण्यात आली. यामुळेच अनेकांचा पत्ता या निवडणुकीत कट झाला. त्याची राजकीय धगधग कायम आहे. मंत्रिमंडळ विस्तारातही ही राजकीय काटाकाटी दिसून आली. राजकीय मैदानात खेळली जाणारी ही काटाकाटी आता पतंगाच्या रूपाने मोकळ्या आकाशात खेळली जाणार आहे. कारण यंदा राजकीय पक्षांचे चिन्ह असणारे पतंगच बाजारात विक्रीला आले आहेत. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व समर्थक आपल्या पक्षांचे पतंग खरेदी करून दुसºया पक्षाचा पतंग काटण्यासाठी जणू सज्ज झाले आहेत. यात भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांचे चिन्ह पतंगात समाविष्ट करण्यात आले आहे. पतंगांसाठी विशिष्ट प्रकारच्या काड्या वापरण्यात येतात. त्या आसाममधील बांबूपासून तयार केल्या जातात. तेथील पुरामुळे कच्च्या मालाची वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी पतंगाचे उत्पादनही घटले असले तरी किमतीत फार काही वाढ झाली नाही, असे पतंग व्यावसायिक प्रशांत धोत्रे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरkiteपतंगPoliticsराजकारण