शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करून खासगी हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकाला  भाजपा नगरसेवकाकडून मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 13:58 IST

अहमदनगर: खासगी हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षकाचे अपहरण करून त्याला महापालिकेत नेऊन मारहाण केल्याप्रकरणी भाजपचा  नगरसेवक व सभागृहनेता  स्वप्नील शिंदे याच्यासह भैय्या संपत गोरे व इतर तिघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १३) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर: खासगी हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षकाचे अपहरण करून त्याला महापालिकेत नेऊन मारहाण केल्याप्रकरणी भाजपचा  नगरसेवक व सभागृहनेता  स्वप्नील शिंदे याच्यासह भैय्या संपत गोरे व इतर तिघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १३) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी नगर शहरातील साईदीप हॉस्पिटलमधील सुरक्षारक्षक संजय परशुराम छत्तीसे (वय ४२ रा. रुईछत्तीसी ता. नगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ६ मे रोजी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. छत्तीसे हे ६ मे रोजी दुपारी तीन वाजता साईदीप हॉस्पिटल येथे  सहाव्या मजल्यावर काम करीत असताना तीन अनोळखी व्यक्ती लिफ्टने  त्यांच्याजवळ आले. यावेळी छत्तीसे  यांच्या  नावाची विचारणा करून तू आमचे बरोबर चल, नगरसेवक स्वप्नील शिंदे यांनी बोलविले आहे, असे त्यांना  सांगितले असता छत्तीसे यांनी त्यांना मी येणार नाही मला काम आहे असे सांगितले. यावेळी त्या तिघांनी  छत्तीसे याना बळजबरीने स्कॉर्पिओ गाडीत बसवून ती गाडी महानगरपालिका येथे आणून फियार्दीस गाडीतून उतरविले. 

नगर शहरातील महानगरपालिका येथे पहिल्या मजल्यावर स्वप्नील शिंदे यांच्या दालनामध्ये नेले. शिंदे व इतरांनी  फिर्यादीच्या कानाखाली, पाठीवर लाथाबक्क्यांनी मारहाण केली. भैय्या संपत गोरे याची पाईपलाईन शेतातून जाऊं दे, त्यास विरोध करू नको. जर विरोध केला तर तुझे हात पाय काढून घरी बसवू असा त्याला दम दिला. आॅफिसमध्ये बाजूला बसलेल्या लोकांना ‘पहाता काय रे याचे तंगडे तोडा’ असा दम दिला. तसेच फिर्यादिला मारण्यासाठी चिथावणी दिली. त्यावेळी छत्तीसे यांनी शिंदे यांना सोडवण्यासाठी विनवणी केल्यानंतर शिंदे व त्यांचे माणसाकडून छत्तीसे याना पुन्हा काळ््या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत बसवून  पुन्हा साईदीप हॉस्पिटल येथे सोडून दिले, असे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सोनवणे हे करत आहेत.

...........

सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर गुन्हा दाखल

छत्तीसे हे पोलिस स्टेशनला तक्रार घेऊन गेले होते. गेल्या आठवड्यात मारहाण झाली होती. परंतु पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. छत्तीसे यांचे वडील माजी पोलिस अधिकारी आहेत. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी होती. त्यामुळे छत्तीसे यांनी थेट पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. पोलीस अधीक्षकांनी तोफखाना पोलिस स्टेशनला  तक्रार अर्जाची चौकशी करण्यास सांगितले. पोलिसांनी हास्पिटल व महानगरपालिकेची सीसीटीव्ही कॅमेरे यांचे फुटेज तपासले. त्यामधे काळ्या रंगाच्या स्कोर्पिओमधून छत्तीसे यांना महानगरपालिका व हास्पिटलमध्ये घेऊन जाताना व परत आणून सोडताना दिसत आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.