शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘खो-खो’ खेळालाही ग्लॅमर येईल : हेमंत टाकळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:19 IST

कबड्डीनंतर आता खो-खो या खेळाचाही एशियन गेम्स्मध्ये समावेश झाल्यामुळे खो-खो खेळालाही ग्लॅमर येईल़

अहमदनगर : कबड्डीनंतर आता खो-खो या खेळाचाही एशियन गेम्स्मध्ये समावेश झाल्यामुळे खो-खो खेळालाही ग्लॅमर येईल़ सध्या खो-खो खेळासाठी प्रायोजक कमी असल्यामुळे या खेळाला अपेक्षित ग्लॅमर लाभले नाही़ पण पुढील काळात खो-खो लीग सुरु झाल्यास या खेळालाही चांगले दिवस येतील, असा विश्वास अर्जुन पुरस्कार विजेते खो-खोपटू व खेलो इंडियाच्या तांत्रिक समितीचे सदस्य हेमंत टाकळकर यांनी व्यक्त केला़नगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता टाकळकर यांनी ‘लोकमत’ला भेट दिली़ यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला़ मातीवरुन मॅटवर गेलेल्या खो-खोमधील बदलत्या तंत्रावरही टाकळकर यांनी बोट ठेवले़ ते म्हणाले, खो-खो हा अस्सल भारतीय खेळ आहे़ त्यासाठी मोठा फिटनेस लागतो़ खो-खो हा पाठलागाचा आणि कौशल्याचा खेळ आहे़ पण सध्या खो-खो केवळ पळण्याचा खेळ झाला आहे़ त्यात कौशल्य कमी होत आहे़ पण मातीतल्या खो-खोमध्ये अजूनही ते कौशल्य, थरार टिकून आहे़ मॅटवर इंन्जुरी वाढल्या आहेत़ आधुनिक शुज आले आहेत़ त्यामुळे खेळणे सोपे झाले आहे़ पण कृत्रिम आणि नैसर्गिक खेळ हा फरक यात राहणारच आहे़ मी पूर्वी सात-सात मिनिटे पळती काढायचो़ तशी क्षमता आजच्या खेळाडूंमध्ये दिसत नाही़ आजचा खेळ खूप वेगवान झालाय़ पण कौशल्य हरवले आहे़ खेळाडूंनी कौशल्य आत्मसात करायला हवे़ इतर देशातील खो-खो खेळाडूंनी चांगले कौशल्य आत्मसात केले आहे, असे टाकळकर यांनी सांगितले़ यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते निर्मलचंद्र थोरात उपस्थित होते़‘खो-खो’मध्ये ग्रामीण मुलांचे वर्चस्वखो-खो ग्रामीण भागातील खेळाडूंचा सहभाग मोठा असतो़ त्यांच्यामध्ये चपळाई असते़ विविध स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील संघच विजयी झालेले दिसतात़ त्यातुलनेत शहरी खेळाडू कमी पडतात़खेलो इंडियामुळे खेळाडूंना संधीखेलो इंडियामुळे खेळाडूंना चांगली संधी निर्माण झाली आहे़ खेलो इंडियाचे सामने टी़व्ही़वर लाईव्ह दाखवले जातात़ त्यामुळे खेळाला ग्लॅमर प्राप्त होत आहे़ मागील खेलो इंडिया स्पर्धेत खो-खोचे उपांत्य आणि अंतिम सामने टीव्हीवर दाखविले होते़ त्यामुळे खेळाडूंचीही ओळख तयार होत आहे़ पुढील वर्षी ८ ते २० जानेवारी रोजी बालेवाडी (पुणे) येथे खेलो इंडियाच्या स्पर्धा होत आहेत़ या स्पर्धा नवीन खेळाडू घडविण्यात मोलाचे योगदान देतील़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKho-Khoखो-खो