शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 18:06 IST

मोठ्या कष्टाने मशागत करून खरिपाची तयारी करत असलेला नगर तालुक्यातील बळिराजा आता पाऊस लांबल्याने चिंतातूर झाला आहे.

ठळक मुद्देपावसाची प्रतीक्षा : पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या : शेतकऱ्यांची चिंता वाढली

केडगाव : मोठ्या कष्टाने मशागत करून खरिपाची तयारी करत असलेला नगर तालुक्यातील बळिराजा आता पाऊस लांबल्याने चिंतातूर झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने तालुक्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. महागडी बियाणे आणि खते खरेदी करूनही पावसाची प्रतीक्षा होत असल्याने तालुक्यातील सुमारे २१ हजार हेक्टर खरिपाचे नियोजन धोक्यात सापडले आहे.रब्बीचा असणारा नगर तालुका गेल्या काही वर्षांपासून खरीप पिकांकडे वळला आहे. यामुळे तालुक्यातील खरिपाचे क्षेत्र वाढून २१ हजार हेक्टर इतके झाले आहे. पूर्वमोसमी पावसाने नगर तालुक्यात पेरणीयोग्य परिस्थिती तयार होत असते. यंदा मात्र मान्सूनपूर्व पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. इंधन खर्च वाढल्याने भुर्दंड सोसून शेतकºयांनी शेतीची मशागत केली. महागडी बियाणे व खते खरेदी केली. मात्र पावसाने ओढ दिल्याने पेरणीच्या तयारीत असलेला बळिराजा आता चिंताग्रस्त बनला आहे.तालुक्यात झालेल्या थोड्याफार पावसावर जवळपास २० टक्के शेतकºयांनी पेरण्या करण्याची घाई केली. इतर शेतकरी मात्र समाधानकारक पावसाची व वापसा योग्य जमिनीची वाट पाहत असल्याने त्यांच्या पेरण्या आता लांबल्या आहेत. तालुक्यात बाजरी, मका यांबरोबरच तूर, मूग, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, कपासी आदी खरीप पिकांच्या लागवडी होत असतात. शेतकºयांनी पेरणीचे सर्व नियोजन केले असले तरी पाऊस नसल्याने शेतकरी सध्या पावसाची प्रतीक्षा करत आहे.तालुक्यातील खरीपाचे नियोजनएकूण खरीपाचे क्षेत्र २१ हजार ( आकडे हेक्टर मध्ये)बाजरी-१० हजार ६०७, मका- १ हजार ४६१, तूर-१ हजार २२ ,मुग- ३ हजार ८१२, भुईमुग-८७, सुर्यफुल-२०, सोयाबीन-२ हजार ३९ कपासी ५२० .असे जवळपास २ हजार हेक्टर क्षेत्रावर पेंरणीचे नियोजन करण्यात आले आहे.नगर तालुका कृषी विभागाने खरीपाचे नियोजन केले आहे.मात्र पाउस लांबल्याने पेरण्या लांबल्या आहेत..दि.२५ पर्यंत पाउस झाला नाहीतर खरिपाच्या नियोजनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.खरीप पेरणीचे उद्धीष्ट कमी होऊ शकते.---बाळासाहेब नितनवरे, कृषी अधिकारी, नगर तालुकाइंधन खर्च वाढल्याने जादा खर्च करून आम्ही शेतीची मशागत केली. खते-बियाणे खरेदी केली.मात्र अजून पेरणी योग्य पाउस नसल्याने आमच्या पेरण्या लांबल्या आहेत.लवकर पाऊस झाला नाहीतर हा हंगाम वाया जाणार आहे.यामुळे आधीच आर्थिक संकटात असणारा शेतकरी अजून अडचणीत येईल.-तुषार मेहेत्रे, शेतकरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस