शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खडकवाडी ग्रामपंचायतीच्या कर्मचा-यानेच फोडली पाइपलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 20:59 IST

पाणी पुरवठा करणा-या कर्मचा-यानेच दारूच्या नशेत मुख्य पाइपलाइनचे वॉल तोडल्याने ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. या कृत्यामुळे कर्मचा-यांविरुध्द मंगळवारी पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील खडकवाडी ग्रामपंचायतीने पाइपलाइन दुरुस्त करून व नवीन रोहित्र बसवून पाणी पुरवठा सुरळीत करुनही राजकीय कुरघोडी करीत पाणी पुरवठा करणा-या कर्मचा-यानेच दारूच्या नशेत मुख्य पाइपलाइनचे वॉल तोडल्याने ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. या कृत्यामुळे कर्मचा-यांविरुध्द मंगळवारी पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.खडकवाडी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी मांडओहळ नदीपात्रातून स्वजलधारा योजना व मुख्यमंत्री पेयजल योजनेतून दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना गावठाण व वाडी वस्त्यांसाठी करण्यात आल्या आहेत. यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने मांडओहळ धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्यामधील राजकीय दुफळीमुळे उपाय काढता आला नाही. या पाणी टंचाईमुळे अंघोळीसाठी व टॉयलेटसाठी पाणी नसल्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा असून तीव्र पाणीटंचाईमुळे विद्यार्थ्यांचे व रुग्णांचे हाल होत आहेत. मांडओहळ नदीपात्रातून येणा-या मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत पाण्याचे कनेक्शन घेतल्याने गावठाणात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे ग्रामस्थ हतबल झाले आहेत.

गेल्या दोन महिन्यापासून ग्रामपंचायत पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मागील आठवड्यात नवीन रोहित्र बसविण्यात आले. नवीन मोटार बसविण्यात आली. हे सर्व करीत असताना पाणीपुरवठा करणा-या कर्मचा-याने २५ डिसेंबर रोजी मुख्य पाइपलाइनचे वॉल तोडले. त्यामुळे पाणी येत नव्हते. त्यामुळे आम्ही त्या कर्मचा-यावर कारवाई केली. राजकीय कुरघोडी करून गाव वेठीस धरून माता-भगिनींना त्रास होईल असे कृत्य कोणी करू नये.-ज्ञानदेव गागरे, उपसरपंच, खडकवाडी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर