शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कासारपिंपळगावमध्ये शिपायाची हत्या : गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 14:33 IST

तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील दादा पाटील राजळे महाविद्यालयाचे शिपाई बलभीम छबु कांबळे (वय ४५) यांची मंगळवारी रात्री तिसगाव ते शेवगाव रस्त्यावर हत्या करण्यात आली.

पाथर्डी : तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील दादा पाटील राजळे महाविद्यालयाचे शिपाई बलभीम छबु कांबळे (वय ४५) यांची मंगळवारी रात्री तिसगाव ते शेवगाव रस्त्यावर हत्या करण्यात आली. हॉटेल सार्थकजवळीक जांभूळ ओढा येथे अज्ञात आरोपीने मानेवर वार करून ही हत्या केली.याबाबत मयताचा भाऊ रामदास याने दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीनुसार बलभीम कांबळे हे कुटुंबीयांसमवेत कासार पिंपळगाव येथे राहत असून दादापाटील राजळे महाविद्यालयात शिपाई म्हणून नोकरी करीत होते. मंगळवारी नेहमीप्रमाणे ते सकाळी ७ वाजता मोटारसायकलवरून महाविद्यालयात कामावर गेले. दिवसभर काम करून रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने पत्नी माया हिने मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी तिला घरी येत असल्याचे सांगितले. परंतु बुधवारी सकाळपर्यंत बलभीम घरी आले नाहीत. सकाळी तिसगाव ते शेवगाव रस्त्याने जाणारे अप्पासाहेब नाथा राजळे यांना हॉटेल सार्थक जवळील जांभूळ ओढा या ठिकाणी बलभीम कांबळे यांच्या मानेवर उजव्या बाजूस तसेच शरीरावर ठिकठिकाणी वार करून अज्ञात आरोपीने हत्याराने गंभीर जखमा केल्या त्यातच त्यांचा मृत्यू झाला. राजळे यांनी मयत बलभीम यांचे भाऊ रामदास यांना घटनेची माहिती दिली. त्यावरून रामदास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर तपास करीत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी