शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

केलवडला गढूळाचं पाणी

By admin | Updated: April 19, 2017 13:56 IST

राहाता तालुक्यातील केलवड गावात गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे़

आॅनलाइन लोकमत अस्तगाव (अहमदनगर), दि.१९ - राहाता तालुक्यातील केलवड गावात गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे़ नळाला येणारे पाणी लालसर व शैवालयुक्त असल्यामुळे त्याचा उग्र वास येत आहे़ त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्यामुळे ग्रामस्थांकडून हे पाणी जनावरांना पाजण्यात येते़ मात्र, आता जनावरांनाही त्याचा त्रास सुरु झाला आहे़ जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत गावात पाणी पुरवठा केला जातो़ परंतू, हे पाणी न पिण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे़ त्यामुळे हे पाणी धुणी-भांडी तसेच जनावरांना पाजण्यासाठी वापरले जात आहे़ या पाण्याला उग्र वास येत असल्याने जनावरेही हे पाणी पिण्यास टाळाटाळ करीत असून, काही जनावरांना हे पाणी पिल्यामुळे पचननाचा त्रास सुरु झाला आहे़ त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही हे पाणी जनावरांना घातक असल्याचे सांगितले़ पिण्यासाठी सोडण्यात येणारे पाणी दूषित असल्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे़ नळाला पिण्यायोग्य पाणी ग्रामपंचायतीकडून सोडले जात नाही़ गावातील पाण्याचे स्त्रोतही आटले आहेत. गावात एका सार्वजनिक बोअरला थोडे पाणी आहे़ मात्र, तेथे मोठी गर्दी होत असल्यामुळे नागरिकांना भर उन्हात पाण्यासाठी तिष्ठत उभे रहावे लागत आहे़ काही नागरिक रात्रीच्या वेळी पाणी वाहतात़ त्यामुळे गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे़ स्वच्छ पाण्यासाठी ‘लोकमत’चा पाठपुरावा गावातील दूषित पाणी पुरवठ्याविषयी ‘लोकमत’ने सातत्याने वृत्त प्रकाशित स्वच्छ पाण्यासाठी पाठपुरावा केला आहे़ ‘लोकमत’ने यापूर्वी प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनीधींनी केलवडला भेटी दिल्या़ त्यानंतर काही दिवस गावाला स्वच्छ पाणी पुरवठा झाला़ परंतू पुन्हा काही दिवसांनी दूषित पाणी सोडले जाते. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा नळाला दूषित पाणी येऊ लागले आहे़