नेवासा : येथे एका धार्मिक स्थळी परदेशातील दहा जणांना एकत्र करून जमावबंदीच्या आदेशाचे पालन न केल्याने दोन जणांविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशातील दहा जणांना नगर येथे शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे, पोलीस उपनिरीक्षक बी.एस. दाते, व्हि. यु. गायकवाड, टी. बी. गिते, ए. एस. कुदळे, एम. एल. मुस्तफा, एस. बी. गुंजाळ हे सर्व जण सरकारी पोलीस वाहनातून करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नेवासा शहरात फिरत असताना शहरातील भालदार मज्जिद (मरकस मज्जिद) मध्ये मज्जिदचे ट्रस्टी जुम्माखान नवाबखान पठाण व सलिम बाबुलाल पठाण हे (दोघे राहणार नेवासा खुर्द) यांना जमावबंदीचा आदेश माहीत असतानाही त्यांनी सदर मज्जिदमध्ये बाहेर देशातील दहा व्यक्तींना प्रवेश दिला तसेच सर्व दहा व्यक्ती तेथे राहत असल्याचे समजले. जिबुती देशातील ५, बेनिन देशातील १, डेकॉर्ट देशातील ३, घाना देशातील १ असे एकूण दहा जण सार्वजनिक प्रार्थनास्थळी एकत्र करुन केले होते. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांनी जुम्माखान पठाण व सलीम पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदरची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल प्रतापसिंह भगवान दहिफळे यांनी दिली.
१० परदेशी नागरिकांना ठेवले धार्मिकस्थळी; नेवाशात दोघा जणांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 09:27 IST