शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव हत्याकांड : संदीप कोतकर सीआयडी कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 10:37 IST

बहुचर्चित अशोक लांडे खूनप्रकरणात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी महापौर संदीप कोतकर याला अखेर सीआयडीने केडगाव हत्याकांडात वर्ग करून घेतले़

अहमदनगर : बहुचर्चित अशोक लांडे खूनप्रकरणात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी महापौर संदीप कोतकर याला अखेर सीआयडीने केडगाव हत्याकांडात वर्ग करून घेतले़ कोतकर याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे़केडगाव येथे ७ एप्रिल रोजी राजकीय वादातून संजय कोतकर व वसंत ठुबे या शिवसैनिकांची हत्या झाली होती़ याप्रकरणी संदीप कोतकर याच्यासह ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या गुन्ह्यात आतापर्यंत आठ जणांना अटक करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे़ संदीप कोतकरला केडगाव हत्याकांडात वर्ग करून घेण्याची परवानगी मिळाल्यानंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी त्याला नाशिक कारागृहातून सोमवारी रात्री नगर येथे आणले़ मंगळवारी दुपारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले़यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड़ सुनील बर्वे यांनी युक्तिवाद केला़ ते म्हणाले, केडगाव हत्याकांड घडले त्या दिवशी संदीप कोतकर हा त्याची पत्नी सुवर्णा व इतर फरार आरोपींच्या संपर्कात होता़ त्यांच्यात नेमके काय संभाषण झाले़ तसेच नाशिक कारागृहातून धुळे येथे जाताना संदीप याने आणखी कुणाशी संपर्क केला़ नाशिक येथे चांगली उपचारपद्धती असताना संदीप धुळे येथे का गेला़ तसेचया गुन्ह्यात कसे कटकारस्थान रचले गेले आदी बाबींचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी़ आरोपीच्यावतीने अ‍ॅड़ महेश तवले यांनी युक्तिवाद करत या प्रकरणात पोलिसांनी आधीच पूर्ण तपास केलेला आहे़ त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडी देऊ नये अशी मागणी केली़ दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस़एस़ पाटील यांनी आरोपीला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली़संदीपचे डोळे पाणावलेसुनावणी दरम्यान संदीप कोतकरने न्यायालयात हात जोडून सांगितले की, मी न केलेल्या गुन्ह्याची सध्या शिक्षा भोगत आहे़ जेल काय असते हे मला माहित असताना दुसरा गुन्हा करण्याचा विचारही माझ्या मनात येणार नाही़ मला व माझ्या कुटुंबाला या गुन्ह्यात गोवले गेले आहे़ त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी विनंती त्याने न्यायालयात केली़सुवर्णा कोतकर फरारचकेडगाव हत्याकांडाच्या कटात माजी उपमहापौर सुवर्णा संदीप कोतकर हिचा सहभाग असल्याचे सीआयडीने दोषारोपपत्रात नमूद केलेले आहे़ सीआयडीने मात्र अद्यापपर्यंत सुवर्णा हिला अटक केलेली नाही़ अटक न करण्यामागे काय कारण आहे हे न उलगडणारे कोडे आहे़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड