शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

केडगावला अग्निशमन केंद्र सुरू

By admin | Updated: August 17, 2014 00:04 IST

केडगाव : सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर केडगावमध्ये अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आले.

केडगाव : सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर केडगावमध्ये अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आले. उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या पाठपुराव्यामुळे केडगावकरांना आता महापालिकेच्या अग्निशमन दलाची सेवा तत्काळ उपलब्ध होणार आहे. यात अग्निशमन दलाची गाडी, अत्याधुनिक रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक साहित्यांचा समावेश आहे.सन २००८ मध्ये तत्कालीन महापौर संदिप कोतकर यांनी केडगावमध्ये अग्निशमनकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी नगर-पुणे रस्त्यालगत केंद्राची उभारणीही करण्यात आली. मात्र त्यानंतरच्या काळात हे केंद्र सुरू करण्यात उदासीनता दिसून आली. निधीचे कारण पुढे करून या केंद्राचे पुढील काम रखडविण्यात आले. उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी मात्र हे केंद्र सुरू करण्यासंदर्भात महापौर संग्राम जगताप व आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे पाठपुरावा केला.त्यानंतर स्वातंत्र्यदिनी ही सेवा केडगावकरांना उपलब्ध झाली आहे. यात ८ लाख रुपये खर्चून केंद्र उभारणी करण्यात आली असून, यात राज्य सरकारच्या वतीने अत्याधुनिक सुविधा असणारी रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे मोठे वाहन व इतर छोटे वाहन यांचा समावेश आहे.केडगाव व इतर परिसरात आग किंवा अपघात झाला असल्यास नगरहून रुग्णवाहिका अथवा अग्निशमन दलाचा बंब येण्यासाठी ३० ते४० मिनिटांचा कालावधी लागतो. त्यात वाहतुकीच्या कोंडीचा मोठा अडसर होता. तसेच नगर-पुणे राज्यमार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. अशावेळी सर्व अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेची सेवा असणे गरजेचे होते. यामुळे उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी यासंदर्भात प्रयत्न करून या दोन्हीही सेवा केडगाव अग्निशमन केंद्रात सुरू केल्या आहेत.अग्निशमन वाहन व रुग्णवाहिका २४ तास सेवेसाठी उपलब्ध असणार आहे. अग्निशमनच्या वाहनात पाणी भरण्यासाठी केडगावच्याच बालाजीसंपवेलयेथे व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे पाण्यासाठीही शहरात जाण्याची गरज भासणार नाही. आग, अपघात अथवा इतर आपत्तीच्या वेळी केडगावकरांना तत्पर सेवा देण्यासाठी हे केंद्र २४ तास कार्यरत राहणार असून, येथे ३ कर्मचारी व वाहन चालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जास्त गरज भासल्यास नगरहून कर्मचाऱ्यांची कुमक पुरविण्यात येणार आहे.आजी महापौरांकडून माजी महापौरांचे कौतुकअग्निशमन केंद्र व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात महापौर संग्राम जगताप यांनी माजी महापौर संदिप कोतकर यांचे त्यांच्या महापौर काळातील कामांचे तोंडभरून कौतुक केले. नगर शहराच्या आधी ‘केडगावला’ पाणी देण्याचे त्यांचे व्हिजन होते. केडगावचा पाणी प्रश्न त्यांच्याच प्रयत्नातून कायमस्वरुपी सुटणार आहे. फेज- १, फेज-२ ही कामे त्यांच्याच काळात मंजूर झाल्याचे जगताप यांनी सांगितले.नगर शहरात ७० कोटींची महापालिकेची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी मोहीम सुरू करून ही रक्कम विकासात्मक कामासाठी खर्च करण्यात येईल. शहराच्या पाणीपुरवठ्याचे मुळा धरणातील पंपींग यंत्र बदलणार असून, त्यासाठी ११ केव्ही क्षमतेचा वीज पुरवठा आवश्यक आहे. १ ते २ महिन्यात हे कामपूर्ण होईल.- विजय कुलकर्णी, आयुक्त, महापालिकाअग्निशमन केंद्राचे क्रमांकअग्निशामक वाहनासाठी क्रमांक (०२४१) २३५९५८१ (टोल फ्री नंबर- १०१)अत्याधुनिक रुग्णवाहिकेसाठी टोल फ्री क्रमांक- (१०८)