शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

केडगाव तोडफोड : अकरा शिवसैनिकांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 19:59 IST

केडगाव तोडफोड प्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह अकरा शिवसैनिक मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले. जिल्हा न्यायालयाने या अकरा जणांना जामीन मंजूर केला आहे.

अहमदनगर: केडगाव तोडफोड प्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह अकरा शिवसैनिक मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले. जिल्हा न्यायालयाने या अकरा जणांना जामीन मंजूर केला आहे.केडगाव येथे ७ एप्रिल रोजी सेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली. यावेळी घटनास्थळी संतप्त जमावाने तोडफोड केली होती. याप्रकरणी सेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ६०० जणांवर गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात या आधी पोलीसांनी ३२ शिवसैनिकांना अटक केली असून, त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मंगळवारी संभाजी कदम यांच्यासह विशाल वालकर, प्रशांत गायकवाड, सागर थोरात, अभिषेक भोसले, अदिनाथ राजू उर्फ लक्ष्मण जाधव, तेजस गुंदेचा, बंटी उर्फ कुणाल खैरे, उमेश काळे, सचिन शिंदे, सेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी अशा निंबाळकर हे 11 जण कोतवाली पोलीसांना शरण आले़दुपारी तीन वाजता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.पाटील यांच्या न्यायालयात आरोपींना हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने गुन्ह्याचा तपास करावयाचा असल्याने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. यावर आरोपी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. राहुल पवार यांनी युक्तीवाद करत या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असल्याने आरोपींना जामीन द्यावा अशी माणगी केली. न्यायालयाने दोन्ही बाजुने म्हणने ऐकून घेतल्यानंतर सर्वांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर आरोपीच्यावतीने जामीनासाठी अर्ज केल्यानंतर सर्वांना जमीन मंजूर झाला. जामीन मंजूर झालेल्यांना दर शनिवारी दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागणार आहे. राठोड हजर होणार की, पोलीस पकडणारकेडगाव तोडफोडप्रकरणी माजी आमदार अनिल राठोड यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. गेल्या महिनाभरात पोलीसांनी या गुन्ह्यातील ४३ जणांना अटक केली. यातील बहुतांशी जण स्वत:हून पोलीसांत हजर झाले. राठोड मात्र हे अद्यापपर्यंत पोलीसांत हजर झालेले नाही. त्यामुळे पोलीस त्यांना कधी अटक करणार असा प्रश्न आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड