शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

केडगाव पोलीस ठाण्याचा प्रस्ताव धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 14:34 IST

नगर शहराचे सर्वात मोठे उपनगर म्हणून केडगाव ओळखले जाते़

अहमदनगर : नगर शहराचे सर्वात मोठे उपनगर म्हणून केडगाव ओळखले जाते़ विस्तारणाऱ्या नागरीकरणासह गेल्या काही वर्षांत येथील गुन्हेगारीनेही डोके वर काढले आहे़ गेल्या नऊ महिन्यात या ठिकाणी चार खून झाले़ रस्तालूट, घरफोड्या, मारहाण आदी घटना तर सतत सुरू आहेत़ केडगावात स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण झाले तर काही प्रमाणात येथील गुन्हेगारीला आळा बसणार आहे़ येथील पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मात्र गेल्या अठरा वर्षांपासून प्रलंबित आहे़केडगाव येथे ७ एप्रिल रोजी राजकीय वादातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे येथील पोलीस ठाण्याचा विषय पुन्हा चर्चेत आला़ यावर मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींकडून काहीच पाठपुरावा न झाल्याने या प्रस्तावावर अंमलबजावणी झाली नाही़ गेल्या पंधरा दिवसात या ठिकाणी खुनाच्या दोन घटना घडल्या़ वाढती लोकसंख्या, राजकीय हेवेदावे, येथून जाणारा महामार्ग, बाह्यवळण रस्ता आणि विस्तारणाºया झोपडपट्ट्या आदी कारणांमुळे येथील गुन्हेगारीचा रेषो वाढत आहे़ या ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे, यासाठी अठरा वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे़ केडगाव उपनगर कोतवाली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते़ केडगाव हे शहरापासून पाच किलोमीटर दूर असल्याने या ठिकाणी काही घटना घडल्यास तेथे पोलीस पोहचण्यासही विलंब होतो़ केडगाव येथे पोलीस चौकी असून येथे चार ते पाच पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती आहे़ इतक्या कमी मनुष्यबळात केडगाव येथील कायदा आणि सुव्यवस्था राखणे अवघड होते़राजकारणातील गुन्हेगारी पॅटर्नकेडगाव येथील राजकारणातील गुन्हेगारी पॅटर्न सर्वश्रुत आहे़ एकेकाळी कोतकर घराण्याचा येथे मोठा दबदबा होता़ गेल्या काही वर्षांत मात्र अनेक जण राजकारणात सक्रिय झाले असून, यातून हेवेदावे वाढून भर रस्त्यावर हाणामारीच्या घटना घडत आहेत़ त्यामुळे येथील वातावरण असुरक्षित बनले आहे़या ठाण्यांचे प्रस्ताव प्रलंबितशासन दरबारी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून बोधेगाव (शेवगाव), तिसगाव (पाथर्डी), देवळालीप्रवरा (राहुरी), राशीन (कर्जत), केडगाव, सावेडी उपनगर आदी प्रस्ताव प्रलंबित आहेत.

जिल्ह्यातील ज्या तालुक्यात एक पोलीस ठाणे आहे तेथे दोन पोलीस ठाणे होण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविलेले आहेत़ याबाबत पाठपुरावा सुरू आहे़ येत्या काही दिवसात देवळालीप्रवरा व केडगाव पोलीस ठाण्याला मंजुरी मिळणार आहे़- अरूण जगताप, पोलीस उपाधीक्षक (गृह)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस