शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव हत्याकांडातील मयतांच्या कुटुंबीयांचे उपोषण सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 12:35 IST

केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास पोलिसांकडून योग्य रितीने होत नसल्याचा आरोप मयतांच्या कुटुंबीयांनी केला असून, आजपासून मयत संजय कोतकर यांच्या निवासस्थानी उपोषण सुरू केले आहे

ठळक मुद्देतपास योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप

अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास पोलिसांकडून योग्य रितीने होत नसल्याचा आरोप मयतांच्या कुटुंबीयांनी केला असून, आजपासून मयत संजय कोतकर यांच्या निवासस्थानी उपोषण सुरू केले आहे. हत्येचा कट करणा-यांना फाशीची शिक्षा होण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे. मयत संजय कोतकर यांचा मुलगा व या घटनेतील फिर्यादी संजय कोतकर, मयत वसंत ठुबे यांचा भाऊ प्रमोद ठुबे, सुनीता कोतकर व अनिता ठुबे, महापौर सुरेखा कदम याही उपोषणास बसल्या आहेत.याबाबत शुक्र्रवारी अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील या निवेदनात म्हटले आहे की, ७ एप्रिल रोजी केडगाव येथे आमच्या कुटुंबातील कर्त्या पुरूषांची हत्या झाली़ या घटनेनंतर तपासी अधिकाºयांना आवश्यक ती माहिती देण्यात आली़ या बाबत मात्र काहीच तपास झालेला नाही़ निवडणुकीच्या वादातून संजय कोतकर व वसंत ठुबे यांची कट करून हत्या झाली़  आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरूण जगताप, आमदार संग्राम जगताप व भानुदास कोतकर यांनी कट करून हे हत्याकांड घडवून आणले़ या प्रकरणी संग्राम जगताप व इतर काही जणांना अटक झालेली आहे़ कर्डिले, अरूण जगताप यांना मात्र अद्यापपर्यंत अटक झालेली नाही़ या गुन्ह्यातील आरोपी भानुदास कोतकर व त्याची सून सुवर्णा कोतकर यांचे हत्याकांडापूर्वी फोनवरून संपर्क झालेला आहे़ याबाबत पोलीस कोतकर याला अटक करू शकलेले नाहीत़ कर्डिले व जगताप यांचे घर व हॉटेलमधील सीसीटिव्ही फुटेज गायब करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे़ जगताप व कर्डिले यांना स्टॅडिंग वॉरंटमधून वगळ्यात आले आहे़ केडगाव तोडफोड प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसैनिक स्वत:हून पोलिसांसमोर हजर होत असताना पोलीस रात्री अपरात्री त्यांना अटक करत आहेत़ हत्याकांडाच्या तपासाकडे दुर्लक्ष करून आमच्या कुटुंबावर दहशत निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे़ या सर्व बाबींच्या निषेधार्थ आम्ही दोन्ही कुटुंबातील सदस्य व आमचे नातेवाईक मयत संजय कोतकर यांच्या केडगाव येथील आज सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत उपोषण करणार सुरु करण्यात आले आहे. या हत्याकांडाचा योग्य पद्धतीने तपास झाला नाही तर तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी  याचिका दाखल करणार असल्याचेही म्हटले आहे़ 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड