शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव हत्याकांड : सीआयडी तपास, भानुदास कोतकरचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 19:54 IST

केडगाव दुहेरी हत्याकांडात भानुदास कोतकर याचा सहभाग असल्याचे सीआयडी तपासातही समोर आले आहे. कोतकरच्या जामीन अर्जासंदर्भात जिल्हा न्यायालयाने सरकारी पक्षाला म्हणने सादर करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी या संदर्भात अहवाल देण्यात आला असून, यामध्ये हत्याकांडात कोतकरचा सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अहमदनगर: केडगाव दुहेरी हत्याकांडात भानुदास कोतकर याचा सहभाग असल्याचे सीआयडी तपासातही समोर आले आहे. कोतकरच्या जामीन अर्जासंदर्भात जिल्हा न्यायालयाने सरकारी पक्षाला म्हणने सादर करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी या संदर्भात अहवाल देण्यात आला असून, यामध्ये हत्याकांडात कोतकरचा सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे.दरम्यान कोतकर याच्या जामीन अर्जावर १३ जून रोजी सुनावणी होणार आहे. केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या झाली. या प्रकरणी पोलीसांनी आमदार संग्राम जगताप, भानुदास कोतकर याच्यासह दहा जणांना अटक केली आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कोतकर याने जिल्हा न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर न्यायालयाने सरकारी पक्षाला म्हणने सादर करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी सीआयडीने न्यायालयात म्हणने सादर केले आहे.कोतकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. खुनाच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा झालेली आहे. त्याच्याकडे पैसे आणि ताकद आहे़ केडगाव हत्याकांड हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून याबाबत तपास सुरू आहे. त्यामुळे कोतकर याला जामीन देऊ नये असे म्हणने सादर करण्यात आले आहे. दरम्यान सरकारी पक्षाने शुक्रवारी म्हणने सादर केल्याने यावर अभ्यास करण्यासाठी न्यायालयाने आरोपीपक्षाला वेळ दिला असून, १३ जून रोजी जामीन अर्जावर सुनावणी ठेवण्यात आली आहे.सुवर्णा कोतकरची चौकशी होणार का ?शिवसैनिकांचे हत्याकांड होण्याच्या काही तास आधी केडगाव येथे सुवर्णा कोतकर व विशाल कोतकर यांची एक बैठक झाली होती. या बैठकीतून सुवर्णा कोतकर यांनी त्यांचा सासरा भानुदास कोतकर फोन केला होता. ही बाब विशेष पथकाच्या तपासात समोर आली होती. विशेष पथकाने मात्र सुवर्णा कोतकर यांची चौकशी केली नव्हती. सीआयडी या प्रकरणात सुवर्णा यांची चौकशी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड