शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव हत्यांकाडात आमदार संग्राम जगतापांविरोधात पुरावा नाही : सीआयडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 11:47 IST

केडगाव हत्याकांडप्रकरणी ४३ दिवसांच्या तपासात आमदार संग्राम जगतापसह बाळासाहेब कोतकर यांच्या विरोधात आम्हाला अद्यापपर्यंत काहीच पुरावा मिळाला नाही.

अहमदनगर : केडगाव हत्याकांडप्रकरणी ४३ दिवसांच्या तपासात आमदार संग्राम जगतापसह बाळासाहेब कोतकर यांच्या विरोधात आम्हाला अद्यापपर्यंत काहीच पुरावा मिळाला नाही. त्यामुळेच त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले नाही, असे स्पष्टीकरण मंगळवारी सीआयडीच्या तपासी अधिकाऱ्यांनी जिल्हा न्यायालयात सादर केले आहे.केडगाव हत्याकांडाबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ६ जुलै रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पोलिसांनी अटक केलेल्या भानुदास एकनाथ कोतकर, संदीप रायचंद गुंजाळ, नगरसेवक विशाल बाळासाहेब कोतकर, रवींद्र रमेश खोल्लम, बाळासाहेब विठ्ठल केदार, भानुदास महादेव कोतकर, संदीप ऊर्फ जॉन्टी बाळासाहेब गि-हे व महावीर ऊर्फ पप्पू रमेश मोकळे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. तर कलम १७३ (८) प्रमाणे तपासाचा हक्क कायम ठेवून आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांचे नाव वगळले. न्यायालयाने सीआयडीच्या अधिका-यांना नोटीस काढून जगताप व कोतकर यांची नावे दोषारोपपत्रातून का वगली, याबाबत विचारणा करत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडSangram Jagtapआ. संग्राम जगताप