शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम प्रकरणातून पुण्यातील युवकाचा कर्जतमध्ये खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 17:23 IST

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील चिंचवडे येथील शेखर लक्ष्मण पाचवे (वय २५) हा रविवारी (दि़ २२) कोथरुड येथे आला होता. तेथून त्याचे दुपारी तीन वाजता अपहरण झाले होते. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कर्जत (अहमदनगर) : प्रेम प्रकरणातून पुण्यातील युवकाचा कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी शिवारात तुकाई डोंगराजवळ कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेने कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील चिंचवडे येथील शेखर लक्ष्मण पाचवे (वय २५) हा रविवारी (दि़ २२) कोथरुड येथे आला होता. तेथून त्याचे दुपारी तीन वाजता अपहरण झाले होते. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा भाऊ बसवराज पाचवे याने फिर्याद दाखल केली होती. तपास अधिकारी दिगंबर जाखडे यांनी या घटनेचा तपास करीत शेवटी हा अपहरण झालेला युवक कोणाबरोबर दिसला, हे शोधले़ त्याला शेवटी पाहणारे दोन साक्षीदार भेटले. संशयावरून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच शेखर पाचवेच्या खुनाला वाचा फुटली. आरोपींच्या नातेवाईक असलेल्या मुलीला शेखर पाचवे हा त्रास देत होता, म्हणून त्याचा काटा काढल्याची बाब आरोपींनी कबूल केली. शेखर पाचवेला चार चाकी गाडीने कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी शिवारात तुकाई डोंगराजवळ आणण्यात आले. तेथे त्याच्यावर धारदार कोयत्याने बारा वार करण्यात आले. त्यात त्याचा मृत्यू झाला. शेखर पाचवेचा मृतदेह बिटकेवाडी ते चांदे या रोडलगत टाकून आरोपी पसार झाले. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी सौरभ कंधारे व बंटी ऊर्फ प्रमोद वाघ या दोघांना अटक केली आहे. या आरोपींना घेऊन पुणे येथील पोलीस पथक मंगळवारी घटनास्थळी आले. आरोपींनीच पोलिसांना घटनास्थळ दाखवले. यानंतर या मयत युवकाचा मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. येथे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी तपास अधिकारी दिगंबर जाखडे व अभिजित जोगदंड हे उपस्थित होते. यावेळी कर्जत पोलिसांनी त्यांना मदत केली. या खून प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हा खून कर्जत तालुक्याच्या हद्दीत झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.