शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतची अद्ययावत स्मशानभूमी बनली पर्यटनस्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 14:09 IST

दोन कोटी रुपये खर्चून कर्जत नगरपंचायतीने स्मशानभूमी उभारली आहे. पर्यटनस्थळासारखे देखणे काम करण्यात आल्यामुळे ही स्मशानभूमी पाहण्यासाठी अनेकजण येथे हजेरी लावत आहेत़ 

मच्छिंद्र अनारसे ।   कर्जत : दोन कोटी रुपये खर्चून कर्जत नगरपंचायतीने स्मशानभूमी उभारली आहे. पर्यटनस्थळासारखे देखणे काम करण्यात आल्यामुळे ही स्मशानभूमी पाहण्यासाठी अनेक जण येथे हजेरी लावत आहेत़ कर्जत शहर व उपनगरात स्मशानभूमीची गैरसोय होती. याची दखल घेऊन कर्जत नगरपंचायतीचे तत्कालीन नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे ही समस्या मांडली होती. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिरवळ येथील स्मशानभूमी प्रमाणे कर्जत येथील स्मशानभूमी तयार करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला यासाठी राज्य सरकारने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून २ कोटी रुपये मंजूर केले. यातून येथे शवदहनचे चार युनिट, अंत्यविधीसाठी येणा-यांना प्रशस्त स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे़ जैन समाजासाठी स्वतंत्रपणे चौथारा तयार केला आहे. दुखांकित परिवारासाठी बसण्याची वेगळी व्यवस्था केली आहे़ दशक्रिया विधीसाठी स्वतंत्र घाट तयार केला आहे़ या स्मशानभूमीच्या प्रवेश द्वारावर संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमनाचा पुतळा बसविला आहे़ पंचमहाभुते असलेले प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे़ चौकीदाराची नेमणूक केली आहे़ विसावा ठिकाण, शिवमंदिर, पाप-पुण्याचे स्तंभ उभारण्यात आले आहेत़ मुंडण चौथरा, आंघोळीची सुविधा, पुरूष व महिला यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छता गृह उभारण्यात आले आहे़ १० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, चप्पल स्टॅन्ड, अंत्यसंस्कारावेळी महिला व पुरुष यांना स्वतंत्रपणे बसण्याची व्यवस्था केली आहे़ गोरगरिबांना अस्ती विसर्जन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे़ अंत्यसंस्कारासाठी जे साहित्य लागते तेही एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था केली आहे़ नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी या कामाबाबत समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर