शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यात शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 19:00 IST

वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या वाटपावरुन झालेल्या भांडणात दोन भावांनी मेहुणा व दोन मुलांच्या मदतीने सख्ख्या भावाचा निर्घृण खून केल्याची कर्जत तालुक्यातील भांबोरा गावातील यमाईनगर येथे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या प्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देभांबोरा येथील घटनामेहुण्याचा सहभाग, चौघांविरुध्द गुन्हा

राशीन(कर्जत) : वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या वाटपावरुन झालेल्या भांडणात दोन भावांनी मेहुणा व दोन मुलांच्या मदतीने सख्ख्या भावाचा निर्घृण खून केल्याची कर्जत तालुक्यातील भांबोरा गावातील यमाईनगर येथे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या प्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.हनुमंत कोंडीबा चव्हाण (वय ५५) हे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत मयताचा मुलगा राहुल हनुमंत चव्हाण (वय २७) याने दिलेल्या फिर्यादिवरून रमेश कोंडीबा चव्हाण, किरण रमेश चव्हाण, गणेश रमेश चव्हाण (सर्व रा.यमाईनगर, भांबोरा, ता.कर्जत) ) व सुनिल रामदास पवार (रा.धुगलवडगाव ता.श्रीगोंदा) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आठ वर्षांपुर्वी वडीलांच्या जमिनीतील बहिण भामाबाई सजेर्राव शितोळे यांच्या हिश्याची प्रत्येकी अर्धा एकर शेतजमीन हनुमंत व रमेश या दोघा भावांनी विकत घेतली. सहा वर्षांपुर्वी हनुमंत यांना पैशाची गरज असल्याने घेतलेली अर्धा एकर जमीन भाऊ रमेश यांचे मेहुणे सुनिल रामदास पवार यांना तीन लाखाला परत देण्याच्या बोलीवर खरेदी खताने विकली. पवार यांनी ही जमीन रमेश चव्हाण यांच्या पत्नीच्या नावे खरेदी केली. पाच महिन्यांपुर्वी हनुमंत यांचे कडे पैसे आल्यानंतर तीन लाख रुपये घेऊन गेले. जमीन परत देण्याच्या बोलीप्रमाणे सुनिल पवार यांच्या जमिनीची मागणी केली. पंरतु पवार जमीन परत करण्याचा नकार दिला. यातून सुनिल व भाऊ रमेश यांच्यात वाद सुरू झाला. या वादात सुनिल पवार हस्तक्षेप करीत मेहुणे रमेश सतत बाजू घेत हनुमंतवर दबाव आणत होता असे फिर्यादित म्हटले आहे.रविवारी सांयकाळी जमिनीच्या वादावरुन उभयतांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी सुनिल पवार यांनी दोघा भावांना आपण जमीन मोजून घेऊ, असा सल्ला दिला. मात्र रमेश यांनी न ऐकता हनुमंतला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली व फावडे घेतले. त्यानंतर त्यांची दोन मुले किरण व गणेश अनुक्रमे लाकडी दांडके व लोखंडी कुदळ घेऊन हनुमंत यांच्या अंगावर धावले. यावेळी त्यांच्यात जोराची बाचाबाची झाली. त्याचवेळी मयत हनुमंत यांची राहुल व महेंद्र ही मुले भांडण सोडवण्यासाठी गेले. यावेळी रमेश यांनी हनुमंतला पकडले. किरण चव्हाण याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. गणेश याने कुदळीने चुलत्याच्या डोक्यात प्रहार केला. या जबर मारहाणीमुळे मोठा रक्तस्राव होऊन हनुमंत ते बेशुध्द पडले. त्यानंतर मारहाण करणारे तिघेजण घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान, हनुमंत चव्हाण यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंरतु डॉक्टरांनी चव्हाण यांना मृत घोषीत केले. लोणीकाळभोर पोलीसात याप्रकरणी गुुन्ह्याची नोंद झाली असून तो राशीन पोलीसात वर्ग करण्यात आला. पुढील तपास राशीन दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक वैभव महांगरे करीत आहेत. घटनेनंतर तिघेजण घटनास्थाळावरून पसार झाले. आरोपींचा शोध सुरु असल्याचे राशीनचे पोलीस उपनिरीक्षक वैभव महांगरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत