शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गाडीवाला आया, घरसे कचरा निकालो!; करंजीतील सामाजिक कार्यकर्त्याचा स्वखर्चातून कचरा संकलन उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 12:06 IST

करंजी (ता. पाथर्डी) येथील हॉटेल व्यावसायिक, ग्रामस्थ कचरा त्या वाहनात टाकतात. येथील बसस्थानक परिसरातील व गावातील कचरा मोफत उचलण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे व त्यांची तीनही मुले गेल्या १५ महिन्यापासून करीत आहेत. विशेष म्हणजे या कच-यापासून ते खतनिर्मितीही करत आहेत.

अशोक मोरे ।  करंजी : गाडीवाला आया, घरसे कचरा निकालो!, असे कचरा संकलन करणा-या वाहनावरील गाणे कानावर पडताच करंजी (ता. पाथर्डी) येथील हॉटेल व्यावसायिक, ग्रामस्थ कचरा त्या वाहनात टाकतात. येथील बसस्थानक परिसरातील व गावातील कचरा मोफत उचलण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे व त्यांची तीनही मुले गेल्या १५ महिन्यापासून करीत आहेत. विशेष म्हणजे या कच-यापासून ते खतनिर्मितीही करत आहेत.नगर-पाथर्डी मार्गावरील करंजी हा महत्वाचा थांबा आहे. येथील प्रसिद्ध असलेले भेळ, भजे, कुंदा खाण्यासाठी लांब-लांबचे प्रवाशी आवर्जुन थांबतात. त्यामुळे सहाजिकच येथील हॉटेल व्यवसायही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बसस्थानकावर तीसहून अधिक हॉटेल आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांना कचरा विल्हेवाटीचा प्रश्न भेडसावत असे. येथील सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे यांनी या बसस्थानकावरील तसेच गावातील कचरा साफ करण्याचे ठरविले. कचºयापासून खतनिर्मिती होवू शकते हे ओळखून त्यांनी घरीच आपल्या शेतीवर खत निर्मितीचा छोटा प्रकल्प तयार केला. कचरा संकलन व वाहतुकीसाठी त्यांनी कचरा गाडी तयार केली. सकाळ-संध्याकाळी न चुकता कचरा संकलन करण्याचे काम त्यांची मुले सुरज क्षेत्रे, धीरज क्षेत्रे व सिद्धार्थ क्षेत्रे करीत आहेत. कचरा गाडीवर ‘लाऊड स्पिकर’ बसविलेला आहे. त्याचे गाणे ऐकून ग्रामस्थ, हॉटेल व्यावसायिक साठलेला कचरा त्या वाहनात टाकतात. त्यांच्या खत निर्मितीच्या प्रकल्पाला आतापर्यंत परिसरातील अनेक अधिकारी, राजकीय पदाधिकाºयांनी भेटी दिल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल हॉटेल व्यावसायिक व ग्रामस्थांचे आभार मानत आहेत.

करंजी बसस्थानक परिसरातील हॉटेल, गावातील कचरा स्वखर्चातून उचलत आहे. त्यातून खत निर्मिती केली जाते. या प्रकल्पास अनेकांनी भेटी दिल्या. मात्र शासकिय पातळीवर कोणतीच दखल घेतली नाही व मदतही मिळाली नाही, असे करंजी येथील सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे यांनी सांगितले.

करंजी बसस्थानक परिसरातील हॉटेल्समधील व गावातील कचरा उचलण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे करीत आहेत. यामुळे गाव स्वच्छ सुंदर राहते. हा त्यांचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, असे सरपंच बाळासाहेब अकोलकर यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीGarbage Disposal Issueकचरा प्रश्नgram panchayatग्राम पंचायत