शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने जाळली कंगनाची प्रतिमा,चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही,शहर शिवसेनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:15 IST

अहमदनगर शहरामध्ये अभिनेत्री कंगना राणावत यांच्या प्रतिमेचे दहन करून त्यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. चितळे रोडवरील नेता सुभाष चौकात झालेल्या या आंदोलनात शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे आदी सहभागी झाले होते.

अहमदनगर  चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने राज्यातील जनतेच्या भावना दुखविल्या आहेत. याच्या निषेधार्थ नगर येथे शिवसेनेच्यावतीने नेता सुभाष चौक येथे कंगना यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेस जोडे मारुन प्रतिमेचे दहन करण्यात आले. 

या आंदोलनात शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, उपजिल्हा उपप्रमुख गिरिश जाधव, नगरसेवक योगिराज गाडे, अमोल येवले, विजय पठारे, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, शशिकांत देशमुख, बाबू कावरे, संग्राम कोतकर, अभिषेक भोसले, अक्षय कातोरे, विशाल गायकवाड आदी शिवसैनिक उपस्थित होेते.

याप्रसंगी दिलीप सातपुते म्हणाले, ज्या महाराष्ट्रात राहतो, ज्या राज्यात कमवतो, त्या राज्याच्या विरोधात भूमिका म्हणजे एकप्रकारे देशद्रोहच आहे. महाराष्ट्राने नाव दिले, पैसे दिले. तरीही तेथील पोलीस, मुख्यमंत्री यांच्याबाबत बेताल वक्तव्य करुन एकप्रकारे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा कंगना राणावत यांनी अपमान केला आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. कंगनाच्या वक्तव्याचा सर्व शिवसैनिक तीव्र निषेध करीत आहेत. कंगनावर तातडीने गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यापुढे नगर जिल्ह्यात कंगना यांचा एकही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.  

नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, कंगना राणावत यांनी नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. तिचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. अशा व्यक्तीला महाराष्ट्रात स्थान नाही. कंगनाच्या कार्यक्रमांवर, चित्रपटांवर जनतेने बहिष्कार घालावा. ----------अहमदनगर शहरामध्ये अभिनेत्री कंगना राणावत यांच्या प्रतिमेचे दहन करून त्यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. चितळे रोडवरील नेता सुभाष चौकात झालेल्या या आंदोलनात शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKangana Ranautकंगना राणौत