शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कलाकेंद्राला परवानगी : जामखेड तालुक्यातील मोहाती ग्रामसभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 18:04 IST

तालुक्यातील मोहा गावाच्या शिवारात नवीन दिवाणखाना व संगीतबारीला सात महिन्यापूर्वी दिलेल्या परवानगीची ग्रामपंचायत दप्तरी नोंद नाही, या मुद्यावरुन विशेष ग्रामसभेत गोंधळ झाला. गोंधळामुळे ही सभा तहकूब करुन पुन्हा दोन जूनला घेण्याचा निर्णय झाला.

जामखेड : तालुक्यातील मोहा गावाच्या शिवारात नवीन दिवाणखाना व संगीतबारीला सात महिन्यापूर्वी दिलेल्या परवानगीची ग्रामपंचायत दप्तरी नोंद नाही, या मुद्यावरुन विशेष ग्रामसभेत गोंधळ झाला. गोंधळामुळे ही सभा तहकूब करुन पुन्हा दोन जूनला घेण्याचा निर्णय झाला.मोहा ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्यानंतर पंधरा दिवसात विशेष ग्रामसभा घेण्यात आली. नवीन दिवाणखाना व संगीतबारीला परवानगी हा सभेचा मुख्य विषय होता. ग्रामपंचायत कार्यालय आवारात सकाळी अकराच्या सुमारास ग्रामसभेला प्रारंभ झाला. दिवाणखाना व संगीतबारीचा विषय चर्चेला येताच एकाचवेळी सर्व ग्रामस्थांनी परवानगी दिलेल्या कागदपत्राची मागणी केली. ग्रामसेवक पी.एस.बुधवंत यांनी कागदपत्रे दाखविण्यास टाळाटाळ केल्याने गोंधळास सुरुवात झाली.उपसरपंच महादेव बांगर म्हणाले, तत्कालीन सरपंच मुक्ता गर्जे, ग्रामसेवकाच्या कालावधीत परवानगीचा विषय झाला. याबाबत आम्हाला काहीच माहित नव्हते, असे सांगितले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यामुळे ही सभा तहकूब करुन ती दोन जूनला घेण्याविषयी निर्णय झाला. या सभेला तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षकांना बोलाविण्यात येईल, असे ठरले.ग्रामसभेस सरपंच सारीका डोंगरे, उपसरपंच महादेव बांगर, ग्रामपंचायत सदस्य गोरख चौधरी, उत्तम गायकवाड, भीमराव कापसे, अशोक रेडे, वामन डोंगरे, तात्या डोंगरे, श्रीकांत रेडे, अशोक रेडे, मल्हारी रेडे, संजय डोंगरे, तुकाराम डोंगरे, शहाजी इंगळे, ग्रामस्थ उपस्थित होते. मोहा शिवारात बीड रस्त्यावर चार कलाकेंद्र अकरा वर्षांपासून आहेत. या कलाकेंद्राचा त्रास गावकऱ्यांना होतो. तत्कालीन सरपंच मुक्ता गर्जे यांनी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात न घेता दिवाणखाना व संगीतबारीसाठी परवानगी दिल्याने ही विशेष ग्रामसभा घेण्यात आली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड